फोटो सौजन्य - सोशल मीडिया
T२० विश्वचषक २०२६ : भारताचा संघ २०२४ च्या विश्वचषकामध्ये चॅम्पियन झाला आणि त्याचा उत्साह देशाने धुमधडाक्यात साजरा केला आहे. भारताच्या संघाने २०२४ ला झालेल्या या विश्वचषकामध्ये भारताच्या संघाने एकही सामना न गमावता अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर अंतिम सामन्यात भारताच्या संघाचा सामना साऊथ आफ्रिकेविरुद्ध झाला होता. या सामन्यामध्ये सुरुवातीपासूनच भारताचा संघ डगमगला होता त्यानंतर गोलंदाजीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीने भारतीय गोलंदाजांना धुतलं होतं. त्यानंतर शेवटच्या पाच ओव्हरमध्ये खेळ पलटला आणि भारताच्या संघ विश्वविजेता झाला. आता २०२६ मध्ये होणाऱ्या T२० विश्वचषकाच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
आता मोठी अपडेट समोर येत आहे की, भारत २०२६ मध्ये होणाऱ्या T२० विश्वचषकाचे आयोजन करणार असा खुलासा झाला आहे. वाराणसी क्रिकेट स्टेडियम २०२६ मध्ये होणाऱ्या T२० विश्वचषकाचे आयोजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. या विश्वचषकाची भगवान शिव थीम असणार आहे असा दुसरा खुलासा झाला आहे. त्यामुळे भारतामध्ये भव्य दिव्य विश्वचषकाचे आयोजनाची तयारी सुरु झाली आहे.
🚨WORLD CUP IN VARANASI…!!!! 🚨
– The Lord Shiva themed Varanasi Cricket Stadium will be ready to host the 2026 T20 World Cup. (TOI). pic.twitter.com/9yDZCyBIfi
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 28, 2024
भारताकडे एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद सोपवण्यात आले होते, २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये भारताचा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. परंतु भारताच्या संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी स्टेडियम तुडुंब भरलेली होती, तिकिटांच्या किमतींमध्ये देखील वाढ झाल्या होत्या. विश्वचषकाचा आनंद हा संपूर्ण देशामध्ये साजरा केला जात होता, देशामध्ये उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सोशल मीडियावरील रिच त्याचबरोबर टेलिव्हिजनवरील प्रेक्षक हे दुपटीने वाढले होते. आता भारत T२० विश्वचषक आयोजित करण्यासाठी सज्ज झाला आहे, या विश्वचषकाचे आयोजन वाराणसी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.