बर्लिंगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022) ९ व्या दिवशी पुन्हा एकदा भारतीय खेळाडूंनी आपली कमाल दाखवत अनेक पदक खिशात घेतली आहेत.
लॉन बॉल्स (LawnBowl) सांघिक प्रकारात काही दिवसांपूर्वी महिला संघाने सुवर्ण पदकाची (Gold medal) कमाई केली होती. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष लॉन बॉल्स संघाने रौप्य पदक (Silver Medal) जिंकले आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताच्या इतिहास अजून एका इतिहासाची नोंद केली आहे.
Historic ? for ??'s Men's Fours Team ? Team India wins ?in the final of #LawnBowls Men's Team event – Sunil, Navneet, Chandan & Dinesh vs Northern Ireland Great Work Team? Let's #Cheer4India ??#India4CWG2022 pic.twitter.com/2EpK1P9FM3 — SAI Media (@Media_SAI) August 6, 2022
नॉर्दन आयर्लंडने पहिल्या एन्डपासूनच भारतावर वर्चस्व राखले. पहिल्या एन्डमध्ये नॉर्दन आयर्लंडने १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या एन्डमध्ये तीन गुणांची कमाई करत आपला स्कोर ५ वर नेला. अखेर भारताने ५ व्या एन्डला आपले गुणांचे खाते उघडले. मात्र तोपर्यंत नॉर्दन आयर्लंडने आपली आघाडी ७ वर नेली होती. यानंतर नॉर्दन आयर्लंडने सातव्या एन्डला आपले गुण १० वर पोहचवले. मात्र भारत मोठ्या पिछाडीवर पडला होता. नॉर्दन आयर्लंडने ही आघाडी १८ व्या एन्डपर्यंत १८-५ अशी केली. नॉर्दन आयर्लंडने भारताचा १८-५ असा मोठ्या फरकाने पराभव करत लॉन बॉल्स पुरूष सांघिक (४) स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले.