फोटो सौजन्य - Mumbai Indians सोशल मीडिया
Women’s Premier League 2025 Point Table : महिला प्रीमियर लीग २०२५ मध्ये ६ मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळवण्यात आला. या सामन्यांमध्ये हरमनप्रीत कौरच्या मुंबई इंडियन्सने दीप्ती शर्माच्या यूपी वॉरियर्सचा ६ विकेट्सने पराभव केला. या विजयासह, मुंबई इंडियन्सने प्लेऑफच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकले आहे. या विजयानंतर मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आता सध्या महिला प्रीमियर लीग शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आता कोणता संघ गुणतालिकेमध्ये कोणत्या स्थानावर आहे यावर एकदा नजर टाका.
Champions Trophy 2025 Final : भारतीय संघाचं फायनलच्या सामन्यात पारडं जड, न्यूझीलंडच्या अडचणी वाढणार?
मुंबई इंडियन्सने २०२५ च्या महिला प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. त्यापैकी हरमप्रीत कौरच्या संघाने ४ जिंकले आहेत आणि २ गमावले आहेत. सध्या, ८ गुणांसह, मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दिल्ली कॅपिटल्स अजूनही १० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत आणि २ सामने गमावले आहेत. गुजरात जायंट्स संघ तिसऱ्या स्थानावर आहे.
गुजरातने ६ सामने खेळले आहेत, त्यापैकी ३ जिंकले आहेत आणि ३ गमावले आहेत. दुसरीकडे, स्मृती मानधनाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चा संघ अडचणींमध्ये आहे. आरसीबी ४ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. आरसीबीला सतत पराभवाचा सामना करावा लागत आहे. आरसीबीच्या संघाचे ६ सामने झाले आहेत यामध्ये त्यांनी फक्त २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि ५ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. युपी वॉरियर्सचा संघ या गुणतालिकेमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. युपीच्या संघाने आतापर्यत या स्पर्धेमध्ये फक्त २ विजय मिळवले आहेत.
𝚃𝚑𝚒𝚛𝚍 𝚂𝚞𝚌𝚌𝚎𝚜𝚜𝚒𝚟𝚎 𝚃𝚒𝚖𝚎 👏
Delhi Capitals are the first team to add the ‘𝑸’ in the Points Table 🥳
Which 2 teams will join #DC? 🤨#TATAWPL | #RCBvDC | @DelhiCapitals pic.twitter.com/JKnbl88GQ6
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 1, 2025
महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामात यूपी वॉरियर्सची कामगिरी सातत्याने खराब होत आहे. यूपीला या हंगामातील मुंबई इंडियन्सविरुद्ध पाचवा पराभव पत्करावा लागला. आतापर्यंत, यूपी वॉरियर्सने या हंगामात ७ सामने खेळले आहेत, त्यापैकी २ सामने जिंकले आहेत आणि ५ सामने गमावले आहेत. येथून पुढे, यूपी वॉरियर्ससाठी महिला प्रीमियर लीग २०२५ च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे खूप कठीण मानले जात आहे. या स्पर्धेचा प्ले ऑफचा सामना १३ मार्च रोजी खेळवला जाणार आहे तर फायनलचा सामना १५ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.