फोटो सौजन्य - सोशल मिडिया
India vs Pakistan Toss Update : भारत पाकिस्तान सामना हा चाहत्यांचा पसंतीचा आहे मागील काही वर्षांपासून भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा पाहायला मिळाला आहे पण क्रिकेट चाहते या सामन्याच्या आतुरतेने वाट पाहत असतात. भारत विरुद्ध पाकिस्तान या महा मुकाबलाची सुरुवात झाली आहे. भारताचा संघ सूर्यकुमार यादवचे नेतृत्वाखाली खेळताना दिसेल तर पाकिस्तानचा संघ हा सलमान अली आघाच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना कोलंबो येथील प्रेमादासा स्टेडियमवर खेळवला जात आहे.
या सामन्याचे नाणेफेक पार पडले यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघाने या सामन्यामध्ये भारताच्या हितासाठी काही निर्णय घेतले आहेत. अभिषेक शर्मा हा आता फिट असून त्याचा संघामध्ये पुनरागमन झाले आहे. सामन्यामध्ये संजू सॅमसंग याला अभिषेक शर्माची जागा देण्यात आली होती. त्याला फुड इन्फेक्शन झाल्यामुळे सामना खेळता आले नाही.
🚨 Toss 🚨#TeamIndia have been put into bat. Updates ▶️ https://t.co/IgYYH0TeR9 #T20WorldCup | #MenInBlue pic.twitter.com/rMA2wseuxJ — BCCI (@BCCI) February 15, 2026
तर श्रीलंकेमध्ये सामना होत असल्यामुळे एक पेसरच्या जागी फिरकी गोलंदाजाला संधी देण्यात आले आहे आज कुलदीप यादव विश्वचषक 2026 चा पहिला सामना खेळताना दिसणार आहे. भारत पाकिस्तान सामन्याचे अनेक वाद मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत होते पाकिस्तान भारताविरुद्ध सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता पण त्यांनी हा निर्णय आता मागे घेतला आहे. या दोन्ही संघांची या सामन्यांमध्ये कशी प्लॅन इलेव्हन असणार आहे या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
उस्मान तारीख याची मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. त्याच्या ॲक्शनवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्यामुळे आज त्याची कामगिरी कशी राहणार यावर सर्वांचे नजर असणार आहे त्याचबरोबर भारतीय खेळाडू त्याला कसे खेळतील याकडे देखील लक्ष असणार आहे.
अभिषेक शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
सईम अयूब, साहिबजादा फरहान, सलमान आगा (कर्णधार), बाबर आजम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अशरफ, उस्मान खान (विकेटकीपर), शाहीन अफरीदी, अबरार अहमद, उस्मान तारिक






