फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2025 सुपर सिक्स टीम : भारतीय युवा महिला संघ सध्या T२० विश्वचषक खेळण्यात व्यस्त आहे. भारताच्या संघाने सुरुवातीपासून विश्वचषकामध्ये दबदबा दाखवला आहे. काल म्हणजेच २३ जानेवारी रोजी भारताच्या संघाचा सामना श्रीलंकेविरुद्ध झाला होता. यामध्ये टीम इंडियाने श्रीलंकेच्या महिला संघाचा पराभव ६० धावांनी करत सुपर सिक्समध्ये उडी मारली आहे. साखळी सामन्यांमध्ये भारताच्या संघाची भिडत वेस्ट इंडिज आणि मलेशिया या संघासोबत झाली होती, यामध्ये साखळी सामन्याचा एकही सामना न गमावता सुपर सिक्समध्ये एंट्री केली आहे. आता भारताचा संघ सुपर सिक्समध्ये पोहोचला आहे, यामध्ये कोणता संघ कोणाशी भिडणार आहे. यावर एकदा नजर टाका.
सुपर सिक्समध्ये १२ संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये १२ संघाचे दोन गटामध्ये विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या गटामध्ये भारत, स्कॉटलंड, श्रीलंका, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत. तर दुसऱ्या गटामध्ये साऊथ आफ्रिका, इंग्लंड, यूएसए, नायझेरिया, आयर्लंड आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. या १२ संघ आता पुढील शर्यतीसाठी लढणार आहेत. या १२ संघाचे १२ सामान्यांचे आयोजन करण्यात आले आहे याचे संपूर्ण वेळापत्रक वाचा.
3⃣ Matches
3⃣ Wins #TeamIndia march into Super Six of the #U19WorldCup 👏 👏Updates ▶️ https://t.co/CGNAPCsYgN#INDvSL pic.twitter.com/TGm2p0a4UR
— BCCI Women (@BCCIWomen) January 23, 2025
सुपर सिक्समध्ये १२ सामान्यांचे आयोजन करण्यात आले आहे. अंडर-१९ महिला T२० विश्वचषक २०२५ सुपर सिक्स संघाचे सामने २५ जानेवारीपासून सुरु होणार आहेत. यामध्ये पहिला सामना यूएसए विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध नायझेरिया यांच्यामध्ये होणार आहे. तिसऱ्या सामन्याची भिडत ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज या संघामध्ये होणार आहे. साऊथ आफ्रिका विरुद्ध आयर्लंड यांच्यामध्ये २५ जानेवारीचा चौथा आणि शेवटचा सामना रंगणार आहे.
२६ जानेवारीला सुपर सिक्सचे सामने होणार आहेत. यामध्ये २६ जानेवारीचा पहिला सामना श्रीलंका विरुद्ध स्कॉटलंड यांच्यामध्ये रंगणार आहे. त्यानंतर सुपर सिक्सचा सहावा सामना भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. २७ जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. २८ जानेवारी रोजी ३ सुपर सिक्स सामान्यांचे आयोजन करण्यात आले आहेत. सुपर सिक्सचा आठवा सामना बांग्लादेश विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये होणार आहे तर नववा सामना साऊथ आफ्रिका विरुद्ध यूएसए यांच्या होईल. भारताचा सुपर सिक्सचा सामना स्कॉटलंडविरुद्ध होणार आहे.
२९ जानेवारी रोजी शेवटचे दोन सुपर सिक्सचे सामने होणार आहेत. यामध्ये नायझेरिया आणि आयर्लंड यांच्यामध्ये सामना होणार आहे. त्यानंतर शेवटचा सुपर सिक्सचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात खेळवला जाणार आहे.