वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मीडिया)
Vaibhav Suryavanshi scores a century: भारताचा उदयोन्मुख खेळाडू वैभव सूर्यवंशी सद्या खूपच चर्चेत आहे. तो चर्चेत आहे त्याच्या फलंदाजीच्या शैलीने. ऑस्ट्रेलियाच्या अंडर-१९ आणि भारत अंडर-१९ यांच्यात दोन सामन्यांची युवा कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात, भारतीय अंडर-१९ संघाचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने ७८ चेंडूत शतक झळकावले आहे. या कामगिरीसह तो युवा कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे.
वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्ध ७८ चेंडूमध्ये शतक झळकावून मोठी कामगिरी केली आहे. हे वैभवचे युवा कसोटीत दुसरे शतक आहे, ही दोन्ही शतके ऑस्ट्रेलियाविरुद्ध आली आहेत. १४ वर्षीय या खेळाडूने एक षटकार आणि एक चौकार मारून त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.
हेही वाचा : IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला
वैभव सूर्यवंशीने ३७ चेंडूत त्याचे अर्धशतक तर ७८ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. त्याने शतक गाठण्याच्या प्रवासात प्रथम एक षटकार आणि नंतर दोन चौकार लगावले. वैभव सूर्यवंशीने त्याच्या डावात ८९ चेंडूंचा सामना करत त्यामध्ये त्याने ९ चौकार आणि ८ षटकारांची आतिषबाजी केली. तो ११३ धावांवर बाद झाला. यादरम्यान त्याने सर्व गोलंदाजांसमोर खंबीरपणे फलंदाजी केली.
भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे या सलामी जोडीने डावाची सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या. आयुष २१ धावां काढून बाद झाला. त्यानंतर विहान मल्होत्राही झटपट ६ धावांवर बाद झाला. तेथून वैभव आणि अभिज्ञान यांनी डावाची सूत्रे हाती घेतली आणि १५० हून अधिक धावांची भागीदारी रचली. २२१ धावांवर वैभव शतक ठोकून माघारी परतला. भारताने ८१ षटकांत सर्वबाद ४२८ धावा केल्या आहेत. भारताकडून वेदान्त त्रिवेदिने १५० धावांचे योगदान दिले. भारतीय सघाने १७७ धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात १ गडी गमावून ८ धावा केल्या आहेत.
हेही वाचा : मोहसीन नक्वी यांचा माफीनामा! भयभीत होत BCCI ची मागितली आगाऊ माफी; वाचा सविस्तर
ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २४३ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन होगनने सर्वाधिक ९२ धावा केल्या. जेड हॉलिकने ३८, अॅलेक्स ली यंगने १८, जेम्सने १३ आणि सायमन बजने १५ धावा केल्या. भारताकडून दीपेशने शानदार गोलंदाजी करत पाच विकेट्स घेतल्या. त्याने ४५ धावांत ५ विकेट्स घेतल्या. किशन कुमारने तीन, अम्मोलजोत सिंगने एक आणि खिलन कुमारने एक विकेट्स काढली.