हार्दीक पांड्या आणि हैदर अली(फोटो-सोशल मीडिया)
Hardik Pandya and Haider Ali : पाकिस्तान क्रिकेटपटु नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असतात. पाकिस्तानचा असाच एक क्रिकेटपटू सद्या चांगलाच चर्चेत आला आहे. आपण हैदर अली या खेळाडूबद्दल बोलत आहोत. अलीच्या अडचणीत सद्या चांगलीच वाढ झालेली आहे. तो एका बलात्कार प्रकरणात अडकला आहे. बलात्काराच्या आरोपाखाली त्याला मँचेस्टरमधून अटक करण्यात आली असून त्याचा पासपोर्ट देखील जप्त करण्यात आला आहे. तसेच पीसीबीने देखील त्याला निलंबित केले आहे. अशातच हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ सद्या खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून भारतीय चाहत्यांनी त्याला धन्यवाद म्हटलं आहे. हे नेमकं प्रकरण आहे? याबाबत आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : Karun Nair ला BCCI चा मोठा झटका! इंग्लंड दौऱ्यानंतर दुलीप ट्रॉफी 2025 मधून पत्ता कट; निवड समितीचा मोठा
व्हायरल झालेला व्हिडीओ हार्दिक पांड्या आणि हैदर अली यांच्यामधील सामन्याचा आहे. हा व्हिडीओ २०२२ च्या टी-२० विश्वचषकामधील आहे. यावेळी दोघे समोरासमोर आले होते. या सामन्यात हार्दिक पंड्याने हैदर अलीला आपली शिकार बनवले होती. हैदर अलीने हार्दिक पंड्याच्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता पण हा प्रयत्न फसला आणि चेंडू नीट बॅटवर आला नाही. परिणामी सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर अलीचा झेल पकडला. हा तोच सामना होता ज्यामध्ये विराट कोहलीने स्फोटक फलंदाजी केली होती. त्याच्या खेळीने भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला होता. या सामन्यात विराटने ५३ चेंडूंचा सामना करत नाबाद ८२ धावांची तुफानी खेळी साकारली होती.
Pakistani 🇵🇰 cricketer Haider Ali arrested in the UK on charges of sexual molestation and suspended by PCB
Thank you pandya for owning Himpic.twitter.com/w7EIjAtU42
— Nenu (@Nenu_yedavani) August 8, 2025
हेही वाचा : रविचंद्रन अश्विनचा CSK ला रामराम? IPL 2025 पूर्वी सोडणार संघ; फ्रँचायझीकडे व्यक्त केली ‘ही’ मागणी..
हैदर अलीचे नाव बलात्कार प्रकरणात आल्याने त्याच्या अधकनी वाढल्या असून त्यामुळे त्याचे करिअर धोक्यात आले आहे. जर मँचेस्टरमध्ये तो बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला, तर त्याला जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता आहे. प्रकरणाचा छडा लागेपर्यंत तो ब्रिटन सोडून जाऊ शकत नाही. हैदर अलीने पाकिस्तानकडून खेळताना २ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४२ धावा केल्या आहेत, तर त्याने ३५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळेल आहेत. यामध्ये त्याने ५०५ धावा केल्या आहेत.अली हा अवघ्या 24 वर्षाचा आहे. या वयात तोच आता बलात्काराच्या प्रकरणात अडकला आहे. या प्रकरणामुळे त्याची पाकिस्तानी संघात परतण्याचा रस्ता कठीण असल्याचे मानले जात आहे.