शोएब अख्तर(फोटो-सोशल मीडिया)
Shoaib Akhtar’s statement about Pakistan captain : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी पाकिस्तान संघाची अलीकडेच घोषणा करण्यात आली आहे. बाबर आझम आणि नसीम शाह सारखे अनुभवी खेळाडू आगामी मालिकेसाठी पाकिस्तान संघात पुन्हा परतले आहेत. याबरोबर अनेक स्टार खेळाडूंना संघातून डच्चू देण्यात आला आहे, ज्यात फखर जमान, हरिस रौफ आणि हसन अली या सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. यावर आता माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भाष्य केले आहे. त्याला पाकिस्तान संघाबद्दल विचारण्यात आले असता तो आनंदी असल्याचे दिसून आला नाही. एकेकाळी आपल्या दमदार गोलंदाजीने जगात दहशत माजवणाऱ्या शोएब अख्तरला आगामी मालिकेसाठी पाकिस्तान संघाच्या कर्णधाराचे नाव देखील माहीत नसल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा : Photo : रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या पॉन्टिंगला टाकलं मागे
सोशल मिडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये, एका अँकरने शोएब अख्तरला विचारले की खेळाडूंना कोणत्या आधारावर संघात स्थान देण्यात येत आहे, तेव्हा अख्तरने त्याचा प्रश्न पूर्ण होण्यापूर्वीच अँकरला मध्येच थांबवून “आणि कर्णधार कोण आहे?” असे विचारले. त्यावर अँकरने उत्तर देताना म्हटले की , “सलमान अली आगा सर.” त्यानंतर अख्तर म्हणाला, “ठीक आहे. सुदैवाने, त्याला बदलले नाही.” त्यानंतर दोघेही हसायला लागले. हसत हसत अख्तर पुढे म्हणाला की, “तेही बदलता आले असते. इथे काहीही होण्याची शक्यता आहे. पण आनंदाची बातमी अशी आहे की बाबर आझम संघात परतला आहे.”
टी-२० संघ : सलमान अली आघा (कर्णधार), अब्दुल समद, अब्रार अहमद, बाबर आझम, फहीम अशरफ, हसन नवाज, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, मोहम्मद सलमान मिर्झा, साहिबजादा फरहान (विकेटकीपर), नसीम शाह, सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान (विकेटकीपर) आणि उस्मान तारिक.
एकदिवसीय संघ : शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), बाबर आझम, फहीम अशरफ, अब्रार अहमद, फैसल अक्रम, फखर जमान, हरिस रौफ, हसीबुल्लाह, हसन नवाज, मोहम्मद नवाज, हुसेन तलत, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, सैम अयुब आणि सलमान अली आघा.






