फोटो सौजन्य- X
विनेश फोगाटच्या अपात्रतेमुळे अख्या देशाची निराशा झाली. तो दिवस भारतीयांसाठी ऑलिम्पिकमधील सर्वात दु:खद दिवस ठरला. ऑलिम्पिक कुस्तीमध्ये विनेशने अंतिम फेरीमध्ये धडक दिली आणि देशासाठी पदक निश्चित केले. दुसऱ्या दिवशी अंतिम फेरीकडे सर्व भारतीयांचे लक्ष असताना सकाळी विनेशच्या अपात्रतेची बातमी समोर आली आणि सर्वांना धक्का बसला. 100 ग्रॅम अधिक वजनामुळे विनेशला अपात्र ठरविण्यात आले. आता या प्रकरणी विनेशचे कोच वोलर अकोसने यांनी मोठा खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी विनेशने अथक प्रयत्न करत होती मात्र एकावेळेनंतर तिचा मृत्यू होऊ शकला असता असे सांगितले.
कोच वोलर अकोस यांनी सांगितले की, “विनेशने अंतिम सामन्या अगोदर अथक परिश्रम घेतले तिने आपले सर्वस्व पणाला लावले होते. तिच्या या हार्ड वर्कमुळे मी घाबरलो होतो. तिच्या या कठोर परिश्रमामुळे तिचा मृत्यू होऊ नये अशी भिती सतावत होती.”
अंतिम सामन्याअगोदर विनेश ने आपले वजन नियंत्रणामध्ये आणण्यासाठी तब्बल साडे पाच तास कठीण परिश्रम घेतले मात्र या परिश्रमानंतरही अवघ्या 100 ग्रॅम वजन जास्त आले आणि ती अपात्र ठरली.
कोचची फेसबुक पोस्ट
मीडिया रिपोर्टनुसार, कोच अकोस यांनी एक फेसबुक पोस्ट केली जी नंतर त्यांनी हटविली त्यात त्यांनी लिहिले होते की, “उपांत्य सामन्यानंतर विनेशचे वजन 2.7 किलो जास्त होते. ज्यानंतर आम्ही 1 तास 20 मिनिटे कठोर व्यायाम केला त्यानंतरही 1.5 किलोग्राम वजन जास्त दिसत होते. यादरम्यान तिच्या शरीरावर घामाचा एकही थेंब नव्हता.अकोस यांनी पुढे लिहिले की, आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. मध्य रात्रीपासून ते सकाळी 5.30 वाजेपर्यंत विनेश ने अनेक कार्डियो मशीन्सवर आणि कुस्तीच्या डावांवर मेहनत केली. या दरम्यान विनेश आराम करण्यासाठी केवळ 2 ते 3 मिनिटांचा वेळ घेत होती. शेवटी ती पूर्ण थकून गेली. आम्ही तिला उठविले आणि त्यानंतर तिने सॉना ( वाफेचे स्नानगृह) येथे 1 तास घालविला. मला ही जाणीव होती की तिचा मृत्यू होऊ शकतो. ”
विनेशने CAS कडे केलेली अपीलही फेटाळण्यात आली आहे. मात्र सोशल मीडियापासून सर्वत्र विनेश तूच आमचे गोल्ड आहे असे म्हणत तिला समर्थन दिले जात आहे.