फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विराट कोहली व्हिडीओ : भारताचा क्रिकेट संघ आता इंग्लंडविरुद्ध पाच सामान्यांची T२० मालिका आणि तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारताच्या संघ सातत्याने निराशाजनक कामगिरी केल्यामुळे संघावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आता भारताचा संघ लवकरच चॅम्पियन ट्रॉफीसाठी मैदानात उतरणार आहे. त्याआधी भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. याआधी सध्या भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली सध्या त्याने घेतलेल्या नव्या घरामुळे चर्चेत आहे. त्याने सध्या अलिबागमध्ये नवे घर घेतले आहे, त्यामुळे सध्या सतत चर्चेत आहे. आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये तो चाहत्याला फाटकारताना दिसत आहे.
T20 मध्ये किरॉन पोलार्डच्या नावावर आणखी नवा विक्रम, गेलनंतर असे करणारा जगातला दुसरा फलंदाज
विराट कोहली हे या देशातील ते व्यक्तिमत्व आहे ज्याला प्रत्येकाला भेटायचे आहे. त्याची फॅन फॉलोईंग फक्त भारताचं नाही तर जगभरामध्ये आहे. त्याच्या चाहत्यांना पाहताच ते लगेच त्याच्याकडे पोहोचतात आणि त्याला घेरतात. याच कारणामुळे विराट कोहली कधी-कधी त्याच्या इच्छेनुसार रस्त्यावर फिरू शकत नाही आणि हे त्याने अनेकदा मान्य केले आहे. अलीकडेच पुन्हा एकदा कोहली भारताच्या रस्त्यावर दिसला आणि चाहत्यांनी त्याला घेरले. कोहली त्याच्या चाहत्यांशी चांगला जमतो आणि अनेकवेळा सेल्फी घेण्याची त्यांची इच्छा पूर्ण करतो, पण यावेळी कोहलीला त्याच्या एका चाहत्याचा राग आला. त्याने थोड्याशा रागाच्या स्वरात चाहत्याला दूर राहण्यास सांगितले. यावेळी कोहलीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.
कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये कोहली कुठेतरी जात आहे आणि त्याचे चाहते त्याच्याभोवती आहेत. तेव्हा कोहली म्हणतो, “भाऊ, माझा मार्ग अडवू नका.” यादरम्यान कोहलीच्या स्वरात चिडचिड स्पष्टपणे ऐकू येते. याच व्हिडिओमध्ये एका चाहत्याला कोहलीसोबत सेल्फी घ्यायचा असताना कोहली हलकेच त्याला बाजूला ढकलतो आणि यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत आहे.
Bhai Mera rasta mat Roko 😬 pic.twitter.com/sqWkwDjVxt
— TEJASH 🚩 (@LoyleRohitFan) January 14, 2025
कोहलीचा फॉर्म सध्या भारतासाठी चिंतेचा विषय आहे. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कोहलीची बॅट खेळली नाही. त्याने पाच सामन्यांमध्ये १९० धावा केल्या, त्यापैकी फक्त एक शतक होते, जे त्याने पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केले. या मालिकेनंतर टीम इंडियामध्ये बदलाचे आवाज येत आहेत आणि यादरम्यान अनेक प्रकारच्या बातम्याही समोर येत आहेत. मालिकेनंतर बीसीसीआयचे अधिकारी आणि संघ व्यवस्थापन यांच्यात झालेल्या आढावा बैठकीत खेळाडूंना रणजी ट्रॉफी खेळावी लागेल, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. यावेळी कोहली रणजी ट्रॉफीमध्ये भाग घेतो की नाही हे पाहणे बाकी आहे.