Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kohli-Travis Head: मैदानावरील वाद सोशल मीडियावर पोहोचला; कोहली-हेड वादानंतर ट्रॅव्हिस हेडच्या कुटुंबावर अश्लील कमेंट्सचा मारा

Fans Targeted Travis Head family After Kohli Banter: विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील वाद आता सोशल मीडीयावर पोहोचला आहे. काही चाहत्यांनी हेडच्या कुटुंबियांना ऑनलाईन शिवीगाळ केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 25, 2026 | 01:54 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Close
Follow Us:
  • मैदानावरील वाद सोशल मीडियावर
  • फॅन्सने ट्रॅव्हिस हेडच्या कुटुंबाला केले टार्गेट
  • सोशल मीडियावर पत्नीला शिवीगाळ
इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात केवळ चौकार आणि षटकारांचा पाऊसच नाही पडला तर मैदानावरचं वातावरण देखील चांगलचं तापलं. सामन्यादरम्यान, विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याचे दिसून आले. परंतु, कोहलीने ट्रॅव्हिस हेडसोबत हँडशेक करण्यास नकार दिला, यानंतर हा वाद वाढतच गेला. यांच्यात मैदानावर झालेल्या जोरदार वादाचे आता सोशल मीडियावर देखील एक नव्या वादात रूपांतर झाले आहे. या घटनेनंतर, ट्रॅव्हिस हेडची पत्नी, जेसिका हेडला आणि तिच्या कुटुंबाला ऑनलाइन शिवीगाळ आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

IPL 2026: RCB ची चिंता वाढली; प्लेऑफपूर्वी ‘हा’ स्टार फलंदाज स्पर्धेतून बाहेर, संघासमोर मोठं आव्हान

ट्रॅव्हिस हेडच्या पत्नीला ऑनलाइन शिवीगाळ

ऑस्ट्रेलियन स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडची पत्नी जेसिका हेडने ऑस्ट्रेलियन मीडिया आउटलेट ‘द अ‍ॅडव्हर्टायझर’ला सांगितले की, ‘हँडशेक विवादानंतर, मी सकाळी उठून पाहिले तर माझ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर अपमानजनक आणि शिवीगाळने कॉमेंट्स सेक्शन भरलेले होते. २०२३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यानंतर जे घडले होते, हे अगदी तसेच वाटत आहे. आम्ही ठीक आहोत, पण लोक आमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना टार्गेट करत आहेत.’

जेसिका पुढे म्हणाली की , ‘मला वाटते की सर्व खेळांमध्ये मानसिक आरोग्य, दृष्टिकोन आणि सध्या आपण एकमेकांशी ज्या प्रकारे संवाद साधतो, त्याबद्दल महत्त्वपूर्ण चर्चा होणे आवश्यक आहे. खेळाबद्दल आवड असणे उत्तम आहे, पण आपण हे विसरता कामा नये की खेळाडूंच्या मागे त्यांचे कुटुंबीय आणि इतर माणसे असतात.आशा आहे की, यामुळे लोक एकमेकांशी अधिक दयाळूपणे वागतील आणि एकमेकांना पाठिंबा देतील.’  जेसिका हेडने खुलासा केला की, क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) २०२१-२३ चा अंतिम सामना आणि बॉक्सिंग डे कसोटीनंतर तिच्या कुटुंबालाही अशाच प्रकारच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

नेमकं काय घडलं?

आरसीबी २५६ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करत असताना विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात हा जोरदार वाद झाला. फिरकी गोलंदाज शिवांग कुमारने डावातील चौथे षटक टाकले. ट्रॅव्हिस हेडने टाकलेला चेंडू कोहलीच्या अगदी जवळून गेला, ज्यामुळे कोहली संतापला. यानंतर, कोहली आणि हेड एकमेकांशी वाद घालताना दिसले. षटक संपल्यानंतरही या दोन खेळाडूंमधील वाद सुरूच राहिला. यानंतर, व्यंकटेश अय्यरने मारलेल्या चौकार आणि षटकारांनंतर कोहली वारंवार हेडवर टोमणा मारताना दिसला. कोहलीने ट्रॅव्हिस हेडला नक्की काय म्हटले हे स्पष्ट नाही. हेडसुद्धा गप्प बसला नाहीत आणि त्यानेही विराटला हावभावांनी उत्तर दिले. पुढच्याच षटकात व्यंकटेश अय्यर बाद झाल्याने सामन्यातील रंगत आणखी वाढली. जल्लोषादरम्यान, हेड कोहलीजवळून गेला आणि त्याच्याशी बोलला, ज्यामुळे विराटने सडेतोड उत्तर दिले. याआधी, सामन्याच्या पहिल्या डावात हेड बाद झाल्यानंतर कोहलीने जोरदार जल्लोष केला होता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कोहली सामन्यानंतर हैदराबादच्या इतर खेळाडूंशी हँडशेक करतो, त्याने पॅट कमिन्ससोबत हँडशेक केले, त्यानंतर ट्रॅव्हिस हेडनेही हँडशेकसाठी हात पुढे केला पण त्याने हेडकडे बघितलेही नाही.

Look at Travis Head. when Virat Kohli is saying so many things to him, he still gives a very calm and normal reaction. Many times we have seen that Travis Head believes in answering with his bat, not with his mouth. pic.twitter.com/6OA92WZ5YF — 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) May 22, 2026

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यात हैदराबादने बंगळुरुला धुळ चारली. अभिषेक शर्माने २२ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या, तर इशान किशनने ७९ आणि हेनरिक क्लासेनने ५१ धावा केल्या. एसआरएचने २० षटकांत २५५/४ अशी मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरची सुरुवात खराब झाली. विराट कोहली अवघ्या १५ धावांवर बाद झाला. रजत पाटीदारने ५६ आणि व्यंकटेश अय्यरने ४४ धावा केल्या, पण संघ लक्ष्याच्या जवळ पोहोचू शकला नाही. अखेरीस, एसआरएचने हा सामना ५५ धावांनी जिंकला.

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा

Web Title: Virat kohli travis head handshake controversy jessica head trolling ipl 2026 rcb vs srh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RCB vs SRH
  • Travis Head
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा
1

Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा

वानखेडे स्टेडियमवरील ‘सलाम मुंबई’वरून नवा वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक, स्क्रीनवर ‘नमस्कार मुंबई’ लिहिण्याची मागणी
2

वानखेडे स्टेडियमवरील ‘सलाम मुंबई’वरून नवा वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक, स्क्रीनवर ‘नमस्कार मुंबई’ लिहिण्याची मागणी

KKR vs DC Live Score: दिल्ली कॅपिटल्सचा डाव संपला; कोलकाता समोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य
3

KKR vs DC Live Score: दिल्ली कॅपिटल्सचा डाव संपला; कोलकाता समोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा
4

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.