कोलंबो : आशिया कप (Asia Cup) 2023 सुपर 4 मध्ये सर्वात हायव्होल्टेज सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकवर भारताने ऐतिहासिक २२८ धावांनी विजय मिळवला आहे. रविवारी आणि सोमवारी भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात सामना खेळविण्यात आला. मंगळवारी झालेल्या सामन्यात देखील भारताने श्रीलंकेवर ४१ धावांनी मात केली. यामुळं भारत अंतिम सामन्यात पोहचली आहे. तर आज भारतासोबत अंतिम सामना कोण खेळणार याचा आज फैसला लागणार आहे. आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात काँटे की टक्कर होणार आहे. (who will play the final with india today pakistan vs sri lanka match do you know the changes in both teams)
दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’
हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियम पार पडणार आहे. दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असा सामना आहे. जिंकणारी टीम फायनलमध्ये पोहचेल. तर पराभूत टीमचा प्रवास इथेच संपणार आहे. सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. बाबर आझम पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर दासून शनाका याच्या कॅप्टन्सीत श्रीलंका पाकिस्तान विरुद्ध 2 हात करणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही संघांचा हा सुपर 4 मधील तिसरा सामना असणार आहे.
…तर श्रीलंका संघ अंतिम सामन्यात पोहचेल
मागील काही दिवसांपासून प्रेमदासा स्टेडियममध्ये पावसाने हजेरी लावली. रविवार 10 ते मंगळवार 12 सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तान सामन्यात पावसामुळं दोन दिवस सामना खेळावा लागला. आता पाकिस्तान श्रीलंका सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होणार असाही प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर श्रीलंका नेट रनरेटच्या जोरावर फायनलमध्ये पोहचेल. त्यामुळे या सामन्यात पाऊस आल्यास पाकिस्तानचे आव्हान येथेच संपुष्टात येणार आहे.
पाकिस्तान संभाव्य संघल – बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद हरिस, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह अफ्रीदी आणि जमान खान.
श्रीलंका संभाव्य संघल – दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महेश थिक्षाना, दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, कसून राजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.