फोटो सौजन्य: सोशल मीडिया
Independence Day 2025: जगभरातील भारतीय मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करत असताना, ऑस्ट्रेलियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेलबर्नमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करत असलेल्या भारतीयांच्या कार्यक्रमात खलिस्तानी (Khalistani) गटांनी व्यत्यय आणला आणि गोंधळ घातला. शांततेत सुरू असलेल्या या कार्यक्रमात त्यांनी खलिस्तानी झेंडे (Khalistani Flags) फडकवून घोषणाबाजी केली.
या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एका बाजूला भारतीय नागरिक हातात तिरंगा घेऊन उभे आहेत, तर दुसऱ्या बाजूला खलिस्तानी समर्थक त्यांचे झेंडे घेऊन घोषणा देत आहेत. हे लोक भारतीयांच्या दिशेने पुढे जात गोंधळ वाढवताना दिसले. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
#स्वतंत्रता_दिवस #खालिस्तानी
यह खालिस्तान कभी नहीं सुधरने वाले हैं।
ऑस्ट्रेलिया में भारत के लोग स्वतंत्रता दिवस मना रहे थे वहां पहुंच गए खालिस्तान हंगामा करने के लिए पाकिस्तानी जिहादियों के पैसे पर यह लोग पाल रहे हैं। pic.twitter.com/I49Ai71naE— mr. ᴩᴀᴛʜᴀᴋ (@mr_pathakshiv) August 15, 2025
खालिस्तान्यांच्या या कृतीला भारतीय मागे हटले नाहीत. त्यांनीही ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या जोरदार घोषणा दिल्या. भारतीयांनी एकजुटीने त्यांचा विरोध केला, ज्यामुळे खलिस्तानी समर्थकांना पूर्णपणे यश मिळू शकले नाही.
ऑस्ट्रेलियात खलिस्तानी गटांनी भारतीयांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही महिन्यांपासून असे प्रकार वारंवार घडत आहेत. यापूर्वी, ऑस्ट्रेलियातील बोरोनिया येथील स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करून त्यावर आक्षेपार्ह शब्द लिहिले होते. तसेच, पार्किंगच्या वादातून एका २३ वर्षीय भारतीय तरुणावर अॅडलेडमध्ये हल्ला करण्यात आला होता. खालिस्तानी गटांचा अशा प्रकारचा गोंधळ केवळ ऑस्ट्रेलियातच नव्हे, तर जगातील इतरही अनेक भागांमध्ये दिसून येत आहे. स्वातंत्र्यदिनासारख्या राष्ट्रीय उत्सवात अशा घटना घडल्यामुळे भारतीय समुदायामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही आठवड्यात आयर्लंडमध्ये भारतीयांना लक्ष्य करून हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. कॅनडामध्ये एका भारतीय जोडप्याच्या छळाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारत परदेशात असलेल्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षेला खूप गांभीर्याने घेतो.
भारताने गुरुवारी सांगितले की, त्यांनी आयर्लंडमध्ये भारतीय नागरिकांविरुद्ध होणाऱ्या वाढत्या हिंसाचाराच्या घटनांचा मुद्दा युरोपीय देशासमोर जोरदारपणे उपस्थित केला आहे. ते म्हणाले, ‘आयर्लंडमध्ये भारतीय नागरिकांविरुद्ध हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. आम्ही डब्लिनमधील आयर्लंड अधिकाऱ्यांसोबत तसेच नवी दिल्लीतील दूतावासाकडे हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला आहे.’