Saliya Saman (Photo Credit- X)
Saliya Saman Banned: श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू सालिया समन (Saliya Saman) याला आयसीसीने (ICC) ५ वर्षांसाठी निलंबित केले आहे. एमिरेट्स क्रिकेट बोर्ड (ECB) च्या अँटी-करप्शन कोडचे (Anti-Corruption Code) उल्लंघन केल्याबद्दल हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. ही घटना २०२१ च्या अबू धाबी टी१० लीगशी संबंधित असून, त्यात मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे.
आयसीसीच्या अँटी-करप्शन न्यायाधिकरण टीमने (Anti-Corruption Tribunal) श्रीलंकेचा माजी देशांतर्गत खेळाडू सालिया समन याला दोषी ठरवले आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाच्या क्रिकेटमधून त्याला ५ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्याने मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केल्याने त्याला ही शिक्षा झाली आहे. समनला सप्टेंबर २०२३ मध्येच निलंबित करण्यात आले होते आणि आता त्याच्यावर अधिकृतपणे बंदी घालण्यात आली आहे.
Former Sri Lankan domestic cricketer #SaliyaSaman has been banned from all forms of Cricket for five years after an ICC Anti-Corruption Tribunal found him guilty of breaching the Emirates Cricket Board (ECB) Anti-Corruption Code. pic.twitter.com/3C4OSctYQE
— All India Radio News (@airnewsalerts) August 15, 2025
२०२१ च्या अबू धाबी टी१० क्रिकेट लीगमध्ये सालिया समन याने मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केला. त्याने स्पर्धेतील सामने फिक्स करण्याचा आणि चुकीच्या पद्धतीने त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय त्याने इतर खेळाडूंनाही चुकीच्या कामासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवले. या गंभीर आरोपांमुळे, आयसीसीच्या अँटी-करप्शन न्यायाधिकरणने त्याला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला.
३९ वर्षीय सालिया समन हा श्रीलंकेचा माजी देशांतर्गत अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने श्रीलंका अंडर १७ आणि १९ क्रिकेट संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने १०१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २ शतके आणि २२ अर्धशतकांसह ३६६२ धावा केल्या आहेत, तसेच २३१ बळी घेतले आहेत. लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने ८९८ धावा आणि ८४ बळी घेतले आहेत. टी२० क्रिकेटमध्येही त्याने ४७ सामन्यांमध्ये ६७३ धावा आणि ५८ बळी घेतले आहेत. मात्र, आता मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे त्याच्या कारकिर्दीवर मोठे संकट आले आहे.