फोटो सौजन्य – X
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाल्यानंतर नव्या सायकलला कांगारूच्या संघाने सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत कमालीची कामगिरी करून वेगाने पॉइंट टेबलमध्ये चांगले स्थान गाठण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२७ च्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्व संघाची कसून मेहनत सुरु झाली आहे.
भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध मालिका खेळत आहे तर दक्षिण आफ्रिका देखील कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सध्या मालिकेचा तिसरा सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये दिग्गज खेळाडूंनी जन्म घेतला आहे यामध्ये नॅथन लिओन याचा देखील समावेश आहे. त्याने त्याच्या कामगिरीने नेहमीच त्याच्या संघाला मदत झाली आहे. त्याला त्याच्या संघाने मागील १२ वर्षामध्ये कधीही प्लेइंग ११ मधून वगळले नाही २०२३ मध्ये त्याला बाहेर ठेवण्यात आले होते पण त्यावेळी तो दुखापतग्रस्त होता त्यामुळे तो संघाबाहेर झाला होता.
For the first time in 12 years, Nathan Lyon has been dropped from Australia’s playing XI. The spinner missed three Tests in the 2023 Ashes, but that was due to injury! 🇦🇺🤯🏏#NathanLyon #Tests #WIvAUS #Sportskeeda pic.twitter.com/sJWI1tjD7N
— Sportskeeda (@Sportskeeda) July 13, 2025
नॅथन लिओन याला सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यांमधून वगळण्यात आले आहे यामुळे आता नॅथन लिओन याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत फिरकी गोलंदाज नॅथन लिऑनला वगळले. असे नाही की लिऑन विकेट घेत नाही, परंतु तरीही लिऑनला बाहेर बसणे हे काहीतरी वेगळेच दर्शवित आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाथन लायनच्या जागी वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँड याला संघामध्ये समावेश करण्यात आले आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे तिसऱ्या कसोटी सामन्याचे मैदान. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये हा सामना दिवस-रात्र गुलाबी चेंडूचा सामना सबिना पार्क क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. या मैदानावर फिरकी गोलंदाजांपेक्षा वेगवान गोलंदाजांना जास्त मदत मिळते.
या सामन्यामध्ये फिरकी गोलंदाज नॅथन लायनच्या जागी वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडचा याला संघामध्ये स्थान मिळाले आहे त्यामुळे बोलॅंडच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. या सामन्यात तो बाहेर पडल्यानंतर लायनच्या निवृत्तीबद्दल कोणतीही माहिती नाही.