फोटो सौजन्य : Mi New York
निकोलस पुरन मोठी जबाबदारी : वेस्ट इंडीजचा स्टार फलंदाज निकोलस पुरन याने काल म्हणजेच 10 जून रोजी निवृतीची घोषणा केली त्यामुळे सर्वानाच मोठा धक्का बसला आहे. निकोलस पुरन याने वयाच्या 29 व्या वर्षी त्याने क्रिकेटला अलविदा केला. तो आयपीएल 2025 च्या 18 व्या सिझनमध्ये तो लखनउ सुपर जायंट्सच्या संघाकडून खेळला त्याने या सिझनमध्ये कमालीची कामगिरी केली. आता त्याचे नशीब निवृतीनंतर फुलले आहे, त्याच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानंतर आता मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ मध्ये त्यांचे सहावे विजेतेपद जिंकण्यास मुकावे लागले. एलिमिनेटर सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता फ्रँचायझीने दुसऱ्या लीगसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. मेजर लीग क्रिकेटमध्ये गेल्या हंगामात, एमआय न्यू यॉर्कचे नेतृत्व किरॉन पोलार्डने केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने जेतेपदही जिंकले. यावेळी नवीन हंगामासाठी पोलार्डच्या जागी निकोलस पूरनला नवीन कर्णधार बनवण्यात आले आहे.
India vs Hong Kong : भारतीय फुटबाॅल संघाचा लाजिरवाणा पराभव! अजून किती चूका करणार? चाहते संतापले
आयपीएल 2025 च्या निकोलस पुरनच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर आयपीएल २०२५ निकोलस पूरनसाठी खूप चांगला होता. लखनौ सुपर जायंट्सने या खेळाडूला २१ कोटी रुपयांना रिटेन केले होते. त्यानंतर पूरनने एलएसजीने या खेळाडूला इतक्या मोठ्या रकमेत रिटेन का केले हे सिद्ध केले. आयपीएल २०२५ मध्ये पूरनने स्फोटक फलंदाजी केली आणि १४ सामन्यांमध्ये ५२४ धावा केल्या, त्या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १९६.२५ होता. ज्यामध्ये ५ अर्धशतकांचा समावेश होता. याशिवाय पूरनने सीझन-१८ मध्ये ४० षटकारही मारले आणि तो या सीझनमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाजही होता.
🚨 𝑵𝑬𝑾𝑺 𝑨𝑳𝑬𝑹𝑻 🚨
Nicholas Pooran has been named MI New York captain for MLC 2025, right after stepping away from international cricket. 💙🙌#MLC2025 #NicholasPooran #Cricket #Sportskeeda pic.twitter.com/xYKUCwGyBW
— Sportskeeda (@Sportskeeda) June 11, 2025
पूरन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृतीची घोषणा का केली यासंदर्भात त्याने कोणतेही कारण स्पष्ट केले नाही. त्याने त्याचा फार्म चांगला असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले आहे, तो आता फक्त फ्रॅंन्चायझी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. सध्या तो मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर त्याच्या निवृतीच्या कारणामुळे चर्चेत आहे.