यश दयाल(फोटो-सोशल मीडिया)
Serious allegations against Yash Dayal : भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. भारतीय क्रिकेटपटू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार वेगवान गोलंदाज यश दयालवर एका महिलेकडून मानसिक आणि शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गाझियाबाद येथील या महिलेने यश दयालने लग्नाचे आश्वासन देऊन तिचे मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयात देखील जाऊन पोहोचले आहे, जिथे महिलेकडून तिची तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती गेल्या पाच वर्षांपासून यश दयालसोबत रिलेशनशिपमध्ये राहिली होती. तसेच आता या पीडितेकडून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीच्या ऐतिहासिक विजय झाला आहे. यस दयाल या विजयाचा महत्वाचा भाग राहिला आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामात त्याने १५ सामन्यांमध्ये १३ बळी टिपले आहेत. यश दयाल उत्तर प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत असतो. त्याला अद्याप भारतीय राष्ट्रीय संघात पदार्पणाची संधी मिळालेली नाही. परंतु, आता मात्र तो शारीरिक शोषणाच्या आरोपानंतर दयाल आता पुन्हा चर्चेत आला आहे. दैनिक भास्करने दिलेल्या एका वृत्तानुसार, पीडित महिलेकडून आरोप करण्यात आहे की, यश त्यांच्या नात्यादरम्यान अनेक महिलांशी संबंधात राहिला होता.
हेही वाचा : IND Vs ENG : ‘ECB कडून झाली मोठी चूक..’ पतौडी यांचा अपमान केल्याने माजी खेळाडूचा संताप अनावर
पीडितेने असा दावा केला आहे की, २०२० पासून ती यशला ओळखते. यशने तिला त्याच्या कुटुंबाशी देखील अनेक वेळा ओळख करून दिली आहे. तसेच ती त्याच्या घरी देखील राहिली आहे. परंतु, यश दयालने गेल्या अडीच वर्षांत अनेक मुलींशी संबंध ठेवले आहेत. सतेच पीडितेकडून असा देखील दावा करण्यात आला आहे की, त्यातील तीन मुली तिच्या संपर्कात आहेत, ज्यांच्याशी यशने संबंध ठेवले होते.
अहवालानुसार, यश दयालने या मुलींची देखील फसवणूक केली आहे. तथापि, यश दयाल आणि त्याच्या कुटुंबीयांकडून या पीडित महिलेने केलेल्या या दाव्यांवर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा : IND VS ENG : कर्णधाराच्या एका मेसेजवर थेट बर्मिंगहॅमला पोहचला ‘हा’ खेळाडू, IPL मध्ये उडवली होती खळबळ..
यश दयाल आणि या पीडित महिलेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा फोटो आयपीएल २०२२ चा असल्याचे समोर आले आहे. जेव्हा यश दयाल गुजरात टायटन्सचा भाग होता आणि संघ विजेता ठरला होता, तेव्हा त्या अंतिम फेरीनंतर देखील या पीडित महिलेने दयालसोबतचा तिचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता.