हरप्रीत ब्रार(फोटो-सोशल मीडिया)
IND VS ENG : भारत सद्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टिम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. त्यातील पहिला कसोटी सामना लीड्स येथे खेळवण्यात आला आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताला 5 विकेट्सने पराभूत केले आहे. एकूणच शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी इंग्लंड दौऱ्याची सुरुवात वाईट झालेली दिसून येते. या परभवानंतर टीम इंडियाच्या अनेक कमतरता देखील उघड झाल्या आहेत.
टीम इंडियाच्या या पराभवाचे सर्वात मोठे कारण राहिले आहेत ते म्हणजे भारताची कमकुवत असणारी गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षण. ज्यामुळे शुभमनच्या सनेनेला मालिकेत १-० च्या फरकाने पिछाडीवर राहावे लागले. आता भारतीय संघाला २ जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये दुसरा सामना खेळायचा आहे. यासाठी टीम इंडिया जोरदार तयारी करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या सराव सत्रात एक नवीन खेळाडू दिसून आला आहे.
हेही वाचा : Ravi Bishnoi : ‘मी ३ वेळा बुडालो…’, व्हिडिओसाठी रवी बिश्नोईने स्वतःचा जीव लावला होता डावावर , पहा Video
आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळणारा पंजाब किंग्जचा स्टार फिरकी गोलंदाज हरप्रीत ब्रार बर्मिंगहॅमला पोहचला आहे. अशा परिस्थितीत प्रश्न निर्माण झाला असेल की, हरप्रीत ब्रार टीम इंडियाच्या सराव सत्रात काय करत आहे? याबाबत मात्र त्याने स्वतःच खुलासा केला आहे. हरप्रीतने सांगितले की तो शुभमन गिलच्या बोलावण्यावरून येथे हजर झाला आहे.
शुभमन गिलने फोन केला अन्..
बीसीसीआयकडून हरप्रीत ब्रारचा टीम इंडियाच्या सराव सत्रात येत असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ब्रार सांगतो की, त्याच्या पत्नीचे घर बर्मिंगहॅमजवळील स्विंडन येथे आहे. ते बर्मिंगहॅमपासून फक्त दीड तासाच्या अंतरावर आहे. तो पुढे म्हणाला की काल शुभमनशी बोललो. त्याला कर्णधाराकडून संदेश देण्यात आला. मग मी विचार केला की चला तिथे जाऊन सराव करूया. हा एक खूप वेगळा अनुभव आहे. हा तुमच्या कुटुंबात येण्यासारखा अनुभव असल्याचे त्याने सांगितले.
हेही वाचा : केशव महाराजने रचला इतिहास! असे करणारा ठरला दक्षिण आफ्रिकेचा पहिला खेळाडू
दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. अशी बातमी समोर येत आहे की, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यातखेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या जागी अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.






