फारुख इंजिनियर(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : इंग्लंडमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका खेळवली जाता आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने ५ विकेट्सने जिंकला आहे. या मालिकेत इंग्लंड १-० ने आघाडीवर आहे. या मालिकेबाबत काही वाद देखील सद्या सुरू आहेत. त्यातील एक म्हणजे या मालिकेचे नाव पतौडी ट्रॉफी वरून अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी असे बदलण्यात आले आहे. आता पतौडी यांच्या नावाने विजेत्या संघाच्या कर्णधाराला पदक दिले जाणार आहे. याबाबत मात्र दिवंगत मन्सूर अली खान पतौडी यांचे जवळचे मित्र फारुख इंजिनियर यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, पतौडी पदक देण्याचा निर्णय हा फक्त चाहत्यांना खूश करण्यासाठी घेण्यात आला होता.
ईसीबीकडून २००७ मध्ये भारत-इंग्लंड कसोटी मालिकेसाठी पतौडी ट्रॉफी सुरू करण्यात आली होती. परंतु सध्याची पाच सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वी तिचे नाव बदलवून अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी असे ठेवण्यात आले आहे. सुनील गावस्कर सारख्या क्रिकेटपटूंनी या निर्णयावर निशाणा साधला आहे. तसेच आता इंजिनियर देखील या निर्णयामुळे नाराज आहेत. परंतु त्याच वेळी त्यांना असेही वाटते की, सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांची कामगिरी देखील मोठी आहे.
हेही वाचा : 5 विकेट-हॉलच्या यादीत भारत पहिल्या स्थानावर, वाचा टाॅप 5 फलंदाज कोणते?
तेंडुलकरच्या नावावर ट्रॉफीचे नाव देण्याबाबत त्याने ईसीबीशी संपर्क साधला होता. त्यानंतर इंग्लंड आणि बेल्स क्रिकेट बोर्डाकडून मालिका विजेत्या संघाच्या कर्णधाराला पतौडी पदक देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. इंजिनिअर यांनी मीडिया एजन्सीला सांगितले की, ‘टायगर पतौडी माझे खूप चांगले मित्र होते. ते माझे खूप चांगले सहकारी देखील राहिले आहेत. आम्ही एकत्र अनेक कसोटी सामने खेळलो आहोत. २००७ मध्ये ट्रॉफी त्यांच्या नावावर ठेवण्यात आली तेव्हा मला सर्वात जास्त आनंद झाला.” असे इंजिनिअर म्हणाले.
तसेच इंजिनिअर पुढे म्हणाले की, “एकीकडे पतौडीचे नाव काढून टाकण्यात आल्याने मी निराश झालो आहे. टायगरचे नाव या ट्रॉफीशी जोडले जावे अशी माझी खूप इच्छा होती पण त्याऐवजी या ट्रॉफीचे नाव सचिन आणि अँडरसन यांच्या नावावर ठेवण्यात आले. जे मोठे दिग्गज आहेत. परंतु, पतौडी पदक देण्यात येईल ही मात्र सुरुवातीलाच जाहीर करायला हवे होते.
हेही वाचा : IND VS ENG : कर्णधाराच्या एका मेसेजवर थेट बर्मिंगहॅमला पोहचला ‘हा’ खेळाडू, IPL मध्ये उडवली होती खळबळ..
इंजिनिअर पुढे असे देखील म्हणाले की, “जर हे आधी केले असते तर त्याची विश्वासार्हता अधिक राहिली असती. पण किमान त्यांनी काहीतरी केले आहे. आशा आहे की पतौडीचे नाव नेहमीच त्याच्याशी जोडलेले राहील.” तसेच इंजिनिअर म्हणाले की, “तेंडुलकर आणि अँडरसन यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास कारण नाही. या कथेला दोन बाजू आहेत. त्यांनी पदकाचे नाव पतौडी यांच्या नावावर ठेवले आहे जो खूप विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे.”