सांगली : नुकतीच पुण्यात (Pune) 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari) स्पर्धा पार पडली. त्यानंतर आता याच पार्श्वभूमीवर महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सांगलीत (Sangali) कालपासून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन दिवस चालणार असून, आज स्पर्धेचा अंतिम व शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेचा पहिला बहुमान मिळवण्यासाठी महिला कुस्तीपटू मैदानात घाम गाळत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र केसरीचा खिताब जिंकणाऱ्या महिला पहिलवानाची इतिहासात नोंद होणार आहे. कारण या स्पर्धेचं यंदाचं हे पहिलंच वर्ष आहे. त्यामुळे पहिली महाराष्ट्र केसरी महिला कोण होणार? याकडे आता सर्व कुस्तीप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
स्पर्धा फक्त मॅटवर…
दरम्यान, कालपासून सांगलीत पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दहा वजनी गटासह खुल्या गटांतील कुस्तीपटू सहभागी आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६८, ७२ आणि ७६ वजनी गटातील मल्ल सहभागी आहेत. महाराष्ट्र केसरीसाठी ६५ वजनी गटावरील महिला मल्ल किताबासाठी लढणार आहेत. या स्पर्धेत ४५ जिल्ह्याचे संघ सहभागी झाले असून, ही स्पर्धा फक्त मॅटवर खेळवली जात आहे. दरम्यान, आज अंतिम सामना खेळवला जाणार असून, या स्पर्धेचं यंदाचं हे पहिलंच वर्ष आहे. त्यामुळे पहिली महाराष्ट्र केसरी महिला कोण होणार? याकडे आता सर्व कुस्तीप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
पुरुषांच्या कुस्तीनंतर आता महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या स्पर्धेचं कोणतचं नियोजन नसल्यानं कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. या स्पर्धांसाठी राज्यातील जवळपास 400 अधिक महिला कुस्तीगीर सांगलीत दाखल झालेत. मात्र कुस्ती स्पर्धांच्या ठिकाणी अत्यंत ढिसाळ नियोजन पाहायला मिळाले आहे. ज्या क्रीडा संकुलाच्या आवारात कोणत्याही प्रकारची स्ट्रीट लाईट चालू नसल्याने अंधारातून वाट काढत महिला कुस्तीपटूंना बाहेर पडावे लागतंय. याशिवाय या महिला कुस्तीपटूंचे जेवणाची सोय करण्यात आली होती, त्या ठिकाणी ही अत्यंत ढिसाळ अशा पद्धतीचे नियोजन पाहायला मिळालं. क्रीडा संकुलाच्या अत्यंत छोटयाश्या मेसमध्ये महिला कुस्तीगिरसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती, त्यामुळे रांगेत ताटकळत ठेवून या मुलींना आत सोडण्यात येत होतं. आसन व्यवस्था नसल्याने महिला कुस्तीपटूंना खाली बसून जेवण करावे लागेल. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील नीट नव्हती. जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी देखील कुस्तीगीर महिलांना पाण्याची व्यवस्था नव्हती, ढिसाळ नियोजन व महिला कुस्तीपटूंची गैरसोय होत असल्यामुळं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.