फोटो सौजन्य - Women's Premier League (WPL) सोशल मिडिया
भारताच्या संघाने विश्वचशक जिंकल्यानंतर आता होणाऱ्या २०२६ महिला प्रीमियर लीगचा मेगा लिलावासाठी सर्वच क्रिकेट चाहते फारच उत्सुक आहेत. सोशल मिडियावर देखील WPL ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. २०२६ महिला प्रीमियर लीगचा मेगा लिलाव गुरुवारी नवी दिल्ली येथे होणार आहे. WPL मेगा लिलावात एकूण २७७ खेळाडूंचा समावेश असेल. यादीत १९४ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे, त्यापैकी ५२ आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत आणि ८३ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे, त्यापैकी ६६ आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत.
एकदिवसीय लिलावाची सुरुवात मार्की सेटने होईल, ज्यामध्ये आठ शीर्ष नावे असतील. भारताच्या दीप्ती शर्मा आणि रेणुका सिंग, न्यूझीलंडच्या सोफी डेव्हाईन आणि अमेलिया केर, इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोन, ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिली आणि मेग लॅनिंग आणि दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ड. WPL २०२६ च्या मेगा लिलावात १६ वर्षीय दिया यादव आणि भारती सिंग या सर्वात तरुण खेळाडू आहेत, तर दक्षिण आफ्रिकेची ३७ वर्षीय शबनीम इस्माइल ही सर्वात वयस्कर खेळाडू आहे.
महिला प्रीमियर लीग २०२६ चा लिलाव २७ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणार आहे. या लिलावाला सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. महिला प्रीमियर लीग २०२६ च्या लिलावाचे थेट प्रक्षेपण भारतात जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. WPL २०२६ च्या लिलावाचे भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेलवर देखील थेट प्रक्षेपण केले जाईल.
Where is the World Cup winner heading in the TATA WPL Auction? 🤔#ReemaMalhotra weighs if Arundhati Reddy seeks a new home or returns to her old one. 🫣#TataWPLAuction 👉 THU, NOV 27, 2:30 PM! pic.twitter.com/IxT3ABypbu — Star Sports (@StarSportsIndia) November 27, 2025
WPL ने फ्रँचायझींना असेही कळवले आहे की फलंदाज प्रतीक रावल, यष्टिका भाटिया आणि वेगवान गोलंदाज व्हीजे जोशिता हे सर्व जखमी आहेत. जरी त्यांची नावे लिलावाच्या गटात असली तरी, हे तिन्ही खेळाडू आवश्यक असलेल्या १५ सदस्यीय संघाचा भाग असू शकत नाहीत. जर एखाद्या फ्रँचायझीने या खेळाडूंची निवड केली तर त्यांना बदली खेळाडू वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. WPL ने फ्रँचायझींना असेही कळवले आहे की भारतीय वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकर पूर्णपणे तंदुरुस्त नाही, परंतु ती लिलावाचा भाग असेल. दरम्यान, काश्वी गौतमला तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे.






