मुंबई इंडियन्स संघ(फोटो-सोशल मीडिया)
WPL 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ साठीचा मेगा लिलाव नवी दिल्ली येथे पार पडला आहे. या लिलावामध्ये अनेक प्रमुख स्टार खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांच्या बोली लागल्या आहेत. या लिलावामध्ये न्यूझीलंडची स्टार अष्टपैलू अमेलिया केरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबई इंडियन्सने तिला त्यांच्या संघात समाविष्ट करण्यासाठी जोरदार टक्कल दिली आणि मोठी बोली लावूनखरेदी केले. मुंबई संघाने ₹३ कोटींमध्ये सामील करून घेतले आहे.
मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने अमेलिया केरला सोडले होते. त्यानंतर, त्यांनी स्वतः तिची मूळ किंमत ₹५० लाख ठेवली होती. लिलाव सुरू होताच, यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्समध्ये जोरदार लढाई दिसून आली. अल्पावधीतच किंमत ₹१ कोटी ओलांडली. शेवटी, मुंबई इंडियन्सने ₹३ कोटींची बोली जिंकली आणि मेलिया केरला आपल्या संघात ठेवले.
अमेलिया करने यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी असाधारण कामगिरी बजावली आहे. अमेलियाने तीन WPL हंगामात एकूण ४३७ धावा फटकावल्या आणि ४० विकेट्स घेतल्या आहेत.
२०२४ च्या T20 विश्वचषका स्पर्धेमध्ये न्यूझीलंडच्या विजयात अमेलिया करने महत्त्वाची भूमिका वठवली आहे. तिने संपूर्ण स्पर्धेत १५ विकेट्स तर घेतल्याच परंतु, आपल्या बॅटने १३५ धावा काढल्या आहेत. या कामगिरीसाठी तिला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार देखील मिळाला होता. या विजयात तिच्या महत्वपूर्ण योगदानामुळे न्यूझीलंडला जेतेपद मिळवून देण्यात मोठी मदत झाली होती.
अमेलिया कर ही न्यूझीलंडच्या सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ततीची ओळख आहे. तिने आतापर्यंत किवी संघासाठी ८८ T20I सामने खेळले असून ज्यामध्ये १४५३ धावा केल्या आहेत आणि ९५ विकेट्स देखील काढल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतके ठोकली आहेत, तर तिच्या सातत्यपूर्ण गोलंदाजी कामगिरीमुळे ती संघात एक महत्त्वाची खेळाडू मानली जाते.
हेही वाचा : BCCI कडून WPL 2026 चे वेळापत्रक जाहीर! पहिला सामना कधी व कुठे होणार? वाचा सविस्तर
WPL २०२६ च्या मेगा लिलावात अमेलिया करला संघात घेऊन मुंबई इंडियन्सने सर्वात मोठी कामगिरी केली आहे. तिला तिच्या बेस प्राईसच्या सहा पटीने संघात समाविष्ट करण्यात आले आहे.






