फोटो सौजन्य : ICC
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच हवामानाचा अहवाल : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना सुरू व्हायला फक्त काही तास शिल्लक राहिले आहेत यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे एकमेकांशी भिडणार आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी सामना हा लाॅर्ड्स मैदानावर रंगणार आहे. या सामन्याचे ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व हे पॅट कमिन्स करणार आहे तर टेंम्बा बवुमा हा दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याचा अहवालसमोर आला आहे. WTC अंतिम सामन्यावर पावसाचे सावट पसरले आहे, त्यामुळे आता मोठा प्रश्न निर्माण होत आहे की जर पावसामुळे अंतिम सामना रद्द झाला तर कोणत्या संघाला ट्रॉफी मिळेल? हा सामना ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्याचे टायटल जिंकण्याची संधी आहे, तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला इतिहास घडवण्याच्या इराद्यात असेल.
हवामान विभागाच्या अहवालानुसार, लॉर्ड्सवरील सामन्याच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, जर पावसामुळे सामना रद्द झाला तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल. आयसीसीने डब्ल्यूटीसी फायनलसाठी एक दिवसाचा राखीव दिवस ठेवला आहे.
Two teams. One dream 👑
South Africa and Australia are ready to carve their names in Lord’s history 🤩#Cricket #CricketReels #WTC25 pic.twitter.com/FgeID10JXv
— ICC (@ICC) June 9, 2025
भारताच्या संघाचा न्युझीलंडविरुद्ध त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत झालेल्या मालिकांमध्ये निराशाजनक कामगिरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला होता. या दोन्ही मालिकेमध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या गुणतालिकेमध्ये पहिले दोन स्थान टिकुन ठेवण्यासाठी भारताच्या संघाला दोन्ही मालिकेमध्ये विजय मिळवणे गरजेचे होते. पण भारताच्या संघाचा न्युझीलंडच्या संघाने भारतामध्ये येऊन पराभुत केला होता.
तर दुसरीकडे भारताचा संघ हा ऑस्ट्रेलिया बाॅर्डर गावस्कर ट्राॅफीमध्ये मालिका गमावली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे स्थान गमावले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या संघाने कमालिची कामगिरी केली होती तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने देखील भारताचे स्थान हिसकावुन कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. आता फायनलमध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिल याकडे जगभरामधील सर्व क्रिकेट चाहत्याचे लक्ष असणार आहे.