iQOO 15 Ultra: तगडा प्रोसेसर आणि दमदार बॅटरी... प्रिमियम सेगमेंटमध्ये नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत वाचून बसेल धक्का
आयक्यूओ 15 अल्ट्रा स्मार्टफोन 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज, 16GB+512GB, 16GB+1TB, 24GB+1TB स्टोरेज या चार व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजवाल्या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 5,699 म्हणजेच सुमारे 74,000 रुपये, हायर-एंड 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 78,000 रुपये आणि 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत CNY 6,999 म्हणजेच सुमारे 91,000 रुपये आहे. टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेल 24GB रॅम आणि 1TB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 7,699 म्हणजेच सुमारे 1,00,000 रुपये आहे. हा नवीन स्मार्टफोन 6 फेब्रुवारी विवो चाईना ऑनलाईन स्टोअरद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. आयक्यूओ 15 अल्ट्रा 2077 (ब्लॅक) आणि 2049 (सिल्वर) कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
आयक्यूओ 15 अल्ट्रा एक डुअल सिम स्मार्टफोन आहे, जो अँड्रॉईड 16-बेस्ड OriginOS 6 वर चालतो. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.85-इंच 2K (1,440×3,168 पिक्सेल) सॅमसंग M14 8T LTPO AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, HDR व्हिडीओ सपोर्ट, 8,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, 508 ppi पिक्सेल डेंसिटी, 19.8:9 आस्पेक्ट रेशियो, 1.07 बिलियन कलर्स आणि 94.39 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ आहे. आयक्यूओ 15 अल्ट्रामध्ये ऑक्टा कोर 3nm Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट आहे. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमधील प्रोसेसरमध्ये सहा एफिशिएंसी कोर आणि दोन परफॉर्मेंस कोर आहेत, जे 4.6GHz ची क्लॉक स्पीड देतात.
आयक्यूओ 15 अल्ट्रामध्ये अॅड्रेनो 840 जीपीयू, 24GB पर्यंत LPDDR5x अल्ट्रा प्रो रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.1 इंटरनल स्टोरेज देखील आहे. गेमिंग आणि रिसोर्स-इंटेंसिव टास्कदरम्यान टेम्परेचर निंयत्रित करण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये आयक्यूओचे आइस डोम कूलिंग सिस्टम आहे, ज्यामध्ये 8,000 sq mm ची हीट डिसिपेशन प्लेट आणि एक अॅक्टिव कूलिंग फॅन आहे. यामध्ये लेफ्ट साइड एक हीट वेंट देखील आहे. गेमर्ससाठी या स्मार्टफोनमध्ये दो शोल्डर बटन आणि Q3 ई-स्पोर्ट्स चिप दिले आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, आयक्यूओ 15 अल्ट्रामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 50-मेगापिक्सेल (f/1.88) प्रायमरी शूटर, 50-मेगापिक्सेल (f/2.65) पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल (f/2.05) अल्ट्रावाइड कॅमेरा समाविष्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेल (f/2.2) चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे. हे हँडसेट 8K पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.
आयक्यूओच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 7,400mAh बॅटरी दिला आहे, जी 100W वायर्ड आणि 40W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, ब्लूटूथ 5.4, Wi-Fi 7, एक यूएसबी टाइप-C पोर्ट, बेईडौ, जीपीएस, क्यूझेडएसएस, ग्लोनास आणि गॅलिलिओ आहे. यामध्ये एक एक्सेलेरोमीटर, एक एम्बिएंट लाइट सेंसर, एक प्रॉक्सिमिटी सेंसर, एक जायरोस्कोप, एक ई-कंपास, एक हॉल सेंसर आणि एक इन्फ्रारेड ब्लास्टर असे ऑनबोर्ड सेंसर समाविष्ट आहेत. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये 3D अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
Ans: iQOO हा Vivo चा sub-brand असून मूळ कंपनी चीनची आहे.
Ans: iQOO त्याच्या शक्तिशाली प्रोसेसर, गेमिंग परफॉर्मन्स, फास्ट चार्जिंग आणि किफायतशीर वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते.
Ans: हो. उच्च रिफ्रेश रेट डिस्प्ले, मजबूत GPU आणि कूलिंग सिस्टम सहज गेमिंग अनुभव प्रदान करते.






