JIO Recharge Plan: 6.6TB डेटा, नेटफ्लिक्स प्रीमियम आणि बरेच फायदे... नव्या रिचार्ज प्लॅनची सर्वत्र चर्चा, इतकी आहे किंमत
आता पुन्हा एकदा कंपनीने एक नवा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेला हा रिचार्ज प्लॅन अतिशय खास आहे. कारण या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 6.6TB डेटा, नेटफ्लिक्स प्रीमियम आणि इतर बरेच फायदे मिळणार आहेत. देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या जिओने लाँच केलेल्या नवीन ब्रॉडबँड रिचार्ज प्लॅनची किंमत 8,499 रुपये आहे.
कंपनीने एक नवीन ब्रॉडबँड प्लॅन लाँच केला आहे. या ब्रॉडबँड रिचार्ज प्लॅनची किंमत 8,499 रुपये आहे. जिओचा नवीन प्लॅन1 Gbps ची डाउनलोड आणि अपलोड स्पीडसह लाँच करण्यात आला आहे. हा प्लॅन दर महिन्याला 6600GB किंवा 6.6TB डेटा ऑफर करतो. या प्लॅनमध्ये फ्री वॉयस कॉलिंग बेनिफिट देखील समाविष्ट आहेत. यामध्ये ऑन-डिमांड टीवी चॅनल्स देखील समाविष्ट आहेत. या प्लॅनमध्ये 1000 हून अधिक ऑन-डिमांड टिव्ही चॅनेल्स उपलब्ध आहेत. हा प्लॅन एयरफाइबर कस्टमर्ससाठी देखील उपलब्ध आहे. तथापी, एयरफाइबर कस्टमर्सना कंपनीकडून दर महिन्याला 1TB किंवा 1000GB डेटा मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
FUP (फेयर यूसेज पॉलिसी) डेटाचा वापर केल्यानंतर, स्पीड कमी होऊन 64 Kbps होणार आहे. या प्लॅनसोबत ग्राहकांना ओटीटी फायदे देखील मिळणार आहे. म्हणजेच डेटासोबतच यूजर्सना ओटीटीची देखील मजा मिळणार आहे. कंपनीच्या या 8,499 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स (प्रीमियम), अमेझॉन प्राइम लाइट, यूट्यूब प्रीमियम, जिओहॉटस्टार, सोनीलिव्ह, झी5, सनएनएक्सटी, होईचोई, डिस्कव्हरी+, टाइम्सप्ले, तरंगप्लस, इरॉस नाऊ, लायन्सगेट प्ले, शेमारूमी, ईटीव्हीविन, फॅनकोड (जिओ टिव्ही+ द्वारे) ओटीटी फायदे मिळणार आहेत.
तथापी, कंपनीच्या या प्लॅनमध्ये टॅक्स समाविष्ट नाही. यासाठी फाइनल बिलिंगमध्ये 18% GST देखील समाविष्ट असणार आहे. याशिवाय या प्लॅनचा आणखी एक व्हेरिअंट देखील कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध आहेत. या प्लॅनची किंमत 3999 रुपये आहे. 3999 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 1 Gbps ची स्पीड मिळणार आहे. या प्लॅनमध्ये वर नमूद केलेले सर्व ओटीटी फायदे देखील आहेत, परंतु यामध्ये ग्राहकांना दरमहा 3300GB किंवा 3.3TB डेटा मिळणार आहे.






