Airtel यूजर्सची मजाच मजा! कंपनीने अपडेट केला हा रिचार्ज प्लॅन, आता मिळणार पूर्वीपेक्षा जास्त डेटा
देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यापैकी एक असलेल्या एअरटेलने त्यांच्या युजर्ससाठी एक खास भेट आणली आहे. कंपनी नेहमीच युअर्सच्या फायद्यासाठी नवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. मात्र आता कंपनीने कोणतेही नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला नाही तर कंपनीने त्यांच्या जुन्या रिचार्ज प्लॅनमध्ये काही अपडेट जोडले आहेत.
एयरटेलने भारतात पोस्टपेड यूजर्ससाठी 2,999 रुपयांचा इंटरनेशनल रोमिंग (IR) प्लॅन अपडेट केला आहे. कंपनीचा हा प्लॅन 10 दिवसांची वॅलिडिटी देतो. शिवाय या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड डेटा एक्सेस दिला जातो. मात्र यामध्ये 5GB FUP लिमिट सेट केलेली होती. आता कंपनीने हाई-स्पीड डेटा लिमिट डबल केली आहे. आता ही लिमिट 10GB झाली आहे. यानंतर चार्ज आकारला जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने केलेले हे अपडेट यूजरसाठी फायद्याचं ठरणार आहे. जिथे आधी 5GB ची लिमिट होती, तीच लिमिट आता कंपनीने डबल केली आहे. त्यामुळे आता युजर्सना एक्सट्रा डेटाचा आनंद घेता येणार आहे. एक्स्ट्रा डेटाशिवाय, प्लॅनमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. 2,999 रुपयांचा एयरटेल पोस्टपेड इंटरनेशनल रोमिंग पॅक 10 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करतो. या प्लॅनमध्ये 20 फ्री SMS आणि रोज 100 मिनिटं कॉल टाइम ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये, इनकमिंग, आउटगोइंग, लोकल आणि भारतातील कॉल्स समाविष्ट आहेत.
2,999 रुपयांचा एयरटेल पोस्टपेड IR पॅक जगभरातील 189 देशात मान्य आहे, ज्यामध्ये संयुक्त अरब अमीरात (UAE) आणि सऊदी अरब सारखे देश देखील आहे. हा प्लॅन युजर्ससाठी भारताहेरील कोणत्याही देशात गेल्यावर ऑटोमॅटिकली ॲक्टिव्ह होतो. 2,999 रुपयांचा एयरटेल IR पॅक अशा काही पोस्टपेड IR प्लॅन्सपैकी आहे, ज्यामध्ये इन-फ्लाइट बेनिफिट्स नाहीत. असाच दुसरा एकमेव प्लॅन म्हणजे 648 रुपयांचा 1 दिवसाचा पॅक. याचा अर्थ असा की वापरकर्त्यांना फ्लाइटमध्ये कॉलिंग, मेसेजिंग किंवा डेटा बेनिफिट्स मिळत नाहीत.
एयरटेलने एंटरटेनमेंट लवर्ससाठी 279 रुपयांचा नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एका महिन्याची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे. या प्लॅनमध्ये Netflix, JioHotstar आणि Zee5 सह 25 हून अधिक ओटीटी प्लॅन्सचे फ्री सब्स्क्रिप्शन दिले जात आहे. या एंटरटेनमेंट प्लॅनमध्ये युजर्सना 1GB डेटा देखील ऑफर केला जात आहे. मात्र या प्लॅनमध्ये ग्राहकांना कॉलिंगची सुविधा दिली जाणार नाही.