Claude 3.7 Sonnet: AI च्या शर्यतीत आता Amazon ची एंट्री, OpenAI आणि DeepSeek ला टक्कर देण्यासाठी तयार केलं अनोखं मॉडेल
तुम्हाला आठवतय का काही दिवसांपूर्वी चीनचे AI मॉडेल डिपसिकने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. डिपसिकने OpenAI च्या AI चॅटबोट चॅटजीपीटीला मागे टाकलं होतं. या दोन्ही मॉडेलसमध्ये कडाक्याची टक्कर सुरु होती. OpenAI आणि डीपसिकची ही शर्यत सुरु असतानाच आता आणखी एका नव्या AI मॉडेलने या शर्यतीत उडी घेतली आहे. आता अॅमेझॉनने Claude 3.7 Sonnet नावाचं एक AI मॉडेल लाँच केलं आहे.
Amazon ची गुंतवणुक AI कंपनी Anthropic ने त्यांचे नवीनतम लेटेस्ट लँग्वेज मॉडल Claude 3.7 Sonnet लाँच केले आहे. हे AI मॉडेल ChatGPT, DeepSeek आणि Grok सारख्या मोठ्या मॉडेल्सना आव्हान देण्यासाठी सज्ज आहे. यासोबतच, कंपनीने डेव्हलपर्ससाठी क्लाउड कोड हे नवीन टूल देखील सादर केले आहे. हे नवीन टूल म्हणजे कंपनीने AI एजंटच्या शर्यतीत टाकलेले पहिले पाऊल म्हटलं जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या AI मॉडेलची सर्वात खास गोष्ट म्हणजे रिजनिंग मोड – Extended Thinking Mode – Anthropic आहे. याने Pre-Trained आणि Independent Reasoning Models च्या पूर्वीच्या संकल्पनेची जागा घेतली आहे. आता युजर्स थेट Claude ला सखोल विचार (Extended Thinking Mode) करण्यास सांगू शकतात. यामुळे मॉडेलला गणित, भौतिकशास्त्र, कोडिंग आणि सूचना चांगल्या प्रकारे समजतील.
कंपनीचे म्हणणे आहे की Claude 3.7 Sonnet हे ओपनएआयच्या o-3 Mini (हाय) आणि DeepSeek R1 सारख्या स्पर्धकांपेक्षा अधिक अचूक आणि शक्तिशाली आहे. हे AI मॉडेल मोफत आणि सशुल्क सबस्क्रिप्शनवर उपलब्ध असेल. फ्री यूजर्स केवळ Claude 3.7 Sonnet च्या प्री-ट्रेंड मॉडलचा वापर करण्यास सक्षम असणार आहेत. तर पेड यूजर्स त्याच्या एक्सटेंडेड थिंकिंग मोडमध्ये प्रवेश करू शकतील. यासोबतच, ते त्याच्या इतर प्रगत वैशिष्ट्यांचा देखील वापर करू शकतील.
रिझनिंग मॉडेल अॅडव्हान्स्ड लँग्वेज मॉडेल (एलएलएम) हे Claude 3.7 Sonnet चे एक नवीन वैशिष्ट्य आहे, जे सर्वात जटिल समस्या सोडवण्यासाठी आणि मानवासारखी विचारसरणी विकसित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. पहिले रिझनिंग मॉडेल ओपनएआयने सप्टेंबर 2024 मध्ये o1 या नावाने प्रसिद्ध केले. यानंतर, गुगल, डीपसीक आणि एलोन मस्कच्या ग्रोक सारख्या मोठ्या AI कंपन्यांनी त्यांचे रीजनिंग मॉडेल सादर केले. Anthropic चा दावा आहे की त्यांचे रीजनिंग मॉडेल गणित आणि संगणक विज्ञानापेक्षा वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
Anthropic ने डेव्हलपर्ससाठी एक AI एजंटिक टूल – Claude Code देखील लाँच केले आहे. हे कंपनीचे पहिले AI एजंट टूल आहे. हे कंपनीचे कमांड-लाइन टूल आहे, ज्याच्या मदतीने डेव्हलपर्स त्यांच्या टर्मिनलवरून थेट AI ची मदत घेऊ शकतात. हे टूल गिटहब एक्सटेंशनद्वारे वापरले जाऊ शकते. हे डेव्हलपर्सना कोडिंगमध्ये मदत करण्यासाठी खास डिझाईन करण्यात आले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, चिनी AI स्टार्टअप कंपनी डीपसीकने त्यांचे पहिले एआय मॉडेल DeepSeek-R1 लाँच करून AI इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडवून दिली. या AI मॉडेलची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती फक्त 6 मिलियन डॉलर्समध्ये विकसित करण्यात आली. दुसरीकडे, OpenAI आणि Meta सारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी AI मॉडेल्सवर अब्जावधी डॉलर्स खर्च केले होते. DeepSeek R1 लाँच झाल्यानंतर, AI कंपन्यांनी त्यांच्या धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यास सुरुवात केली आहे.