मजबूती आणि स्टाईलचं उत्तम कॉम्बिनेशन आहे Realme चा हा स्मार्टफोन, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी
लोकप्रिय टेक कंपनी Realme ने त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Realme C75 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला हा स्मार्टफोन 5G व्हेरिअंट आहे. Realme C75 5G कंपनीने गेल्या वर्षी लाँच केलेल्या Realme C65 5G स्मार्टफोनची जागा घेणार आहे. कंपनीचा हा बजेट स्मार्टफोन 5G कनेक्टिविटीसह मिलिट्री ग्रेड MIL-STD-810H ड्यूरेबिलिटी आणि IP64 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. तुम्हाला कूल आणि स्टायलिश लूकसह नवा स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असेल तर Realme C75 5G सर्वात बेस्ट ऑप्शन आहे.
इमोट, कॅरेक्टर आणि गन स्किनसह मिळणार बरंच काही… ‘हे’ आहेत आजचे Free Fire Max Redeem Codes
Realme चा हा फोन अॅल्यूमिनियम फ्रेमसह येतो. यामध्ये ड्यूरेबिलिटीसाठी कंपनीने दावा केला आहे की, 2 मीटरवरून पडल्यानंतर देखील हा स्मार्टफोन तुटणार नाही. त्यामुळे हा स्मार्टफोन अगदी मजबूत आहे. शिवाय हा स्मार्टफोन हटके स्टाईलसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या. (फोटो सौजन्य – X)
Realme C75 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनचा 4GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंट 12,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंट 13999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोन लिली व्हाइट, मिडनाइट लिली आणि ब्लोसम पर्पल कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Wtf realme launched another smartphone..its Realme C75..
Kya karke manoge Realme walo.
🤦🤦 pic.twitter.com/Mwwiv1juxe— Pushpendra Kumar (@143_pushpendra) May 2, 2025
Realme C75 5G स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा LCD पॅनल देण्यात आला आहे. ज्याचे रेजोल्यूशन HD+, पीक ब्राइटनेस 625 निट्स आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. रियलमीच्या या फोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 6300 चिपसेट देण्यात आला आहे.
स्मार्टफोनच्या बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. हा फोन 5W रिवर्स चार्जिंग सपोर्टसह येतो.
Realme C75 5G स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनलबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 32 मेगापिक्सल GalaxyCore GC32E2 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित कंपनीच्या कस्टम यूजर इंटरफेस Realme UI 6 वर चालतो.
50MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी… Oppo च्या नव्या स्मार्टफोनची चीनमध्ये झाली एंट्री! किती आहे किंमत?
Realme C75 स्मार्टफोन साइड फेसिंग फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. कनेक्टिविटी फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये डुअल SIM, 5G, Wi-Fi 802.11ac, Bluetooth 5.3, आणि USB-C पोर्ट देण्यात आला आहे.