Tech Tips: एआयद्वारे वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवा! मोबाईल- लॅपटॉप कधीच होणार नाही हॅक
कोरोनानंतरच्या काळात जगभरात अनेक गोष्टींमध्ये मोठे बदल झाले. या काळात प्रत्येक गोष्ट डिजिटल होऊ लागल्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले. शाळा, कॉलेजच्या मुलांपासून ते अगदी ऑफिसच्या कामांपर्यंत सर्वच कामे ऑनलाईन होऊ लागली. घर बसल्या सहज शॉपिंग, शिक्षण, ऑफिस इत्यादी अनेक कामे होत असल्यामुळे लोकांचा खूप जास्त वेळ वाचतो. पण चांगल्या गोष्टींचा अनेक लोक दुरुपयोग सुद्धा करतात. मोबाईल आणि लॅपटॉपमधील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळे अप्स मोबाईलमध्ये घेतले जातात. या अप्सच्या वापरामुळे मोबाईलमध्ये डेटा सुरक्षित राहतो पण काहीवेळा हाच डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मोबाईल किंवा लॅपटॉपमधील महत्वपूर्ण डेटा कायमच गुप्त ठेवण्यासाठी एआयचा वापर करावा.(फोटो सौजन्य – istock)
TECH EXPLAINED: AI Voice Assistant म्हणजे काय? कसं करतं काम? वापरण्यापूर्वी वाचा सविस्तर
एआय आपल्याला मदत करते, परंतु चुकीची माहिती शेअर केल्याने गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो. काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवू शकता. एआय टूल्स अनेकदा तुमचा चॅट इतिहास जतन करतात आणि कधीकधी टीमद्वारे त्यांचे पुनरावलोकन केले जाते. म्हणून, नेहमी चॅट्सना सार्वजनिक संभाषणे म्हणून समजा. तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला जे सांगणार नाही ते एआयलाही लिहून सांगू नका.
एआय चॅटमध्ये कधीही फोन नंबर, पत्ते, पासवर्ड, बँक तपशील, ओटीपी, आयडी नंबर किंवा वैयक्तिक संभाषणे यांसारखा डेटा प्रविष्ट करू नका. एआयला तुमची ओळख आवश्यक नाही आणि ती तुमची गोपनीयता धोक्यात आणू शकते.
आता क्रोम स्वतः करणार ब्राउजिंग! Gemini AI मुळे ट्रिप प्लॅनपासून ईमेलपर्यंत सगळं ऑटो
अनेक एआय अॅप्समध्ये चॅट इतिहास बंद करण्याचा किंवा डेटा बचत मर्यादित करण्याचा पर्याय असतो, सेटिंग्जमध्ये जा आणि तुम्हाला वापरायची नसलेली वैशिष्ट्ये बंद करा. यामुळे तुमची माहिती कमी वाचेल.एआयकडून कल्पना, माहिती आणि टिप्स घ्या, परंतु वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी किंवा मोठे निर्णय घेण्यासाठी त्याचा वापर करू नका. त्याची उत्तरे अनेकदा चुकीची असू शकतात.कागदपत्रे, ईमेल किंवा स्क्रीनशॉट पाठवण्यापूर्वी, त्यात नावे, पत्ते किवा इतर वैयक्तिक माहिती आहे का ते तपासा.






