अॅपल देणार 200MP कॅमेरा (फोटो सौजन्य - iStock)
अॅपलचे फोन म्हणजे सगळ्यांसाठीच एक क्लासीनेस झालाय. आजकाल बरेच जण अॅपल आयफोन वापरतात. त्यामुळे अॅपल आपल्या आगामी आयफोनचा कॅमेरा अपग्रेड करण्याची योजना आखत आहे. कंपनीकडून सध्या असे वृत्त आले आहे की, ते सध्या २००-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सरची चाचणी घेत आहे. जर अहवालांवर विश्वास ठेवला तर, कंपनी भविष्यात त्यांच्या हाय-एंड आयफोन मॉडेलमध्ये २००-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देऊ शकते.
अॅपलबद्दलची ही माहिती डिजिटल चॅट स्टेशनने शेअर केली आहे, ज्याने यापूर्वी अॅपलच्या आगामी उत्पादनांबद्दल योग्य माहिती शेअर केली आहे. सॅमसंगने आतापर्यंत त्यांच्या दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन्स गॅलेक्सी एस२३ अल्ट्रा आणि गॅलेक्सी एस२४ अल्ट्रामध्ये २०० एमपी सेन्सर दिला आहे. ही उपकरणे त्यांच्या हाय रिझोल्युशन इमेजेस आणि चांगल्या डिजिटल झूमसाठी लोकप्रिय आहेत. २००-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सरची चाचणी सुरू झाल्यानंतर, असे दिसते की आता अॅपल देखील या दिशेने वाटचाल करत आहे. फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये हाय-रिझोल्यूशन फोटोग्राफीच्या बाबतीत सॅमसंग सध्या वर्चस्व गाजवत आहे. त्यामुळेच हा निर्णय अॅपलने घेतला असावा अशी चर्चा सुरू झाली आहे (फोटो सौजन्य – iStock)
२०० एमपी कॅमेरा सेन्सरचे फायदे
२०० एमपी सेन्सर केवळ RAW-रिझोल्युशन वाढवत नाही. त्याऐवजी, हा मोठा आकाराचा सेन्सर कमी प्रकाशाच्या परिस्थितीतही पिक्सेल बिनिंग तंत्रज्ञानासह अनेक पिक्सेल एकत्र करून तेजस्वी आणि तीक्ष्ण प्रतिमा तयार करतो आणि हे फोटो फाटलेले दिसत नाहीत तर ज्यांना फोटोग्राफीची आवड आणि सेन्स आहे त्यांच्यासाठी हा फोन आणि हे अपग्रेड अत्यंत उत्तम ठरू शकते.
आता चीन नाही तर भारत बनतोय Apple Hub! 12 महिन्यांत तब्बल 22 अब्ज डॉलर्सचे iPhone बनवले
२०० मेगापिक्सेल आयफोन कधी येईल?
अॅपल २०० मेगापिक्सेल कॅमेराची चाचणी करत आहे, परंतु त्यासाठी वेळ लागणार आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, आयफोन १७ प्रोमध्ये ४८ मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सरदेखील मिळू शकतो. २०२६ मध्ये लाँच होणारा आयफोन १८ लाइनअप २०० मेगापिक्सेल कॅमेरासह आणण्याची शक्यता आहे. तो आयफोन १९ मध्ये देखील दिला जाऊ शकतो अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आतापर्यंत आलेले अहवाल फक्त चाचणीबद्दल आहेत. अॅपल त्याच्या भविष्यातील डिव्हाइसेससाठी हार्डवेअरची दीर्घकाळ चाचणी करत आहे. ते ज्या हार्डवेअरची चाचणी करते ते त्याच्या डिव्हाइसमध्ये आढळणे आवश्यक नाही. अॅपल सुरुवातीपासूनच कॅमेरा अपग्रेडबद्दल खूप सावधपण काम करत आले आहे. यामध्ये संगणकीय फोटोग्राफी, स्मार्ट एचडीआर आणि iOS वैशिष्ट्यांसह त्याचे डीप इंटिग्रेशनदेखील समाविष्ट आहे. इतर कंपन्या हार्डवेअर स्पेसिफिकेशन्सवर अधिक लक्ष केंद्रित करत असताना, अॅपल हार्डवेअरसह सॉफ्टवेअर इकोसिस्टमवर काम करते असे नेहमीच दिसून आहे आहे.