प्रिमियम फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! 10 हजारांहून कमी लाँच झालाय हा कमाल स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि अशी आहे बॅटरी
Infinix चा नवीन आणि बजेट स्मार्टफोन Infinix Hot 60i बांगलादेशात लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अपकमिंग Hot 60 सीरीजचा पहिला स्मार्टफोन आहे. येत्या काही दिवसांतच कंपनीची नवीन Hot 60 सीरीज लाँच केली जाणार आहे. हा स्मार्टफोन देखील त्याच सिरीजचा भाग आहे. स्मार्टफोनची सर्वसामान्यांना परवडणारी आहे. हा स्मार्टफोन प्रिडिसेसर Infinix Hot 50i सारखाच आहे.
तयार आहात ना! लवकरच सुरु होतोय BSNL चा फ्लॅश सेल, फ्री डेटा आणि डिस्काऊंट मिळण्याची शक्यता
नव्या बजेट स्मार्टफोनमध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत. म्हणजेच स्मार्टफोनची किंमत जरी कमी असली तरी फीचर्सच्याबाबतीत कोणतीही तडजोड करण्यात आली नाही. ग्राहकांना कमी किंमतीत नवे आणि कमालीचे फीचर्स अनुभवण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये 45W चार्जिंग सपोर्टसह पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. नवीन बजेट स्मार्टफोन दोन रॅम+स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Infinix )
Infinix Hot 60i स्मार्टफोन 6GB रॅम+ 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम+ 256GB स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 6GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत BDT 13,999 म्हणजेच सुमारे 9,800 रुपये आणि 8GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत BDT 16,499 म्हणजेच सुमारे 11,500 रुपये आहे. हा स्मार्टफोन स्लीक ब्लॅक आणि टाइटेनियम ग्रे कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन सध्या बांग्लादेशच्या रिटेलर वेबसाइट MobileDokan वर लिस्टेड आहे.
डुअल-सिम (नॅनो+नॅनो) सपोर्ट वाल्या Infinix Hot 60i स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच फुल-HD+ (1,080×2,460 पिक्सेल्स) IPS LCD स्क्रीन देण्यात आली आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 396ppi आणि 800 निट्स पीक ब्राइटनेस आहे. हा स्मार्टफोन Android 15 वर बेस्ड XOS 15.1 वर चालतो. हे 12nm ऑक्टा-कोर MediaTek Helio G81 Ultimate चिपने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे.
हँडसेटमध्ये f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि एक अनस्पेसिफाइड 2-मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा देखील आहे. यामध्ये f/2.0 अपर्चरसह फ्रंटला 8-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देखील आहे.
Infinix Hot 60i मध्ये कनेक्टिविटीसाठी 4G LTE, Wi-Fi 5, Bluetooth 5, NFC, आणि GPS/A-GPS चा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये USB Type-C पोर्ट चार्जिंग देखील आहे.
हँडसेटमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि यामध्ये 5160mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. फोनमध्ये एक्सेलेरोमीटर, कंपास, आणि जायरोस्कोप सारखे सेंसर्स आहेत.