Pixel 9a vs iPhone 16e: Apple की Google, कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट? कोणाची किंमत कमी? जाणून घ्या सविस्तर
स्मार्टफोन कंपनी Google ने नुकताच त्यांचा नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन Google Pixel 9a लाँच केला आहे. तर काही दिवसांपूर्वीच Apple ने iPhone 16e लाँच केला होता. दोन्ही टॉप स्मार्टफोन ब्रँड आहेत आणि आता या दोन्ही कंपन्यांच्या स्वस्त स्मार्टफोन्सची एंट्री झाली आहे. तुम्ही देखील Google Pixel 9a किंवा Apple iPhone 16e स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेकजण या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये गोंधळले आहेत. आता आम्ही तुम्हाला या दोन्ही स्मार्टफोन्सबाबत सविस्तरपणे सांगणार आहोत.
Google Pixel 9a स्मार्टफोनमध्ये 6.3 इंच Actua pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2424×1080 पिक्सेल आहे आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. या डिस्प्लेमध्ये HDR सपोर्ट आणि Gorilla Glass 3 प्रोटेक्शन देखील आहे. iPhone 16e मध्ये 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले आहे, ज्याचा नॉच iPhone 14 सारखा आहे. (फोटो सौजन्य – X)
Pixel 9a स्मार्टफोनमध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 13 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. Pixel 9a स्मार्टफोनमध्ये Add Me, Face Unblur, Magic Editor आणि Eraser सारखे कॅमेरा फीचर्स आहेत. iPhone 16e मध्ये सिंगल 48MP रियर कॅमेरा आहे.
Pixel 9a स्मार्टफोनमध्ये टेन्सर G4 चिपसेट आहे. यासोबतच फोनमध्ये टायटन M2 सुरक्षा चिप देखील उपलब्ध असेल. फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज सपोर्ट आहे. iPhone 16e मध्ये अॅपलचा A18 चिपसेट आहे.
गूगलच्या या नवीन सुपर स्मार्टफोनमध्ये 5100mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 33W वायर्ड आणि 7.5W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. iPhone 16e मधील A18 चिप, C1 मॉडेम आणि iOS 18 च्या कॉम्बिनेशनमुळे बॅटरीची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या सुधारली आहे, असा दावा अॅपलने केला आहे. यात USB-C पोर्ट आहे.
गुगलचा नवीनतम Google Pixel 9a स्मार्टफोन 49,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. 59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत iPhone 16e लाँच करण्यात आला आहे. गुगलच्या स्मार्टफोनसोबत तुलना करता आयफोनची किंमत फार जास्त आहे.
गुगल आणि अॅपल दोन्ही स्मार्टफोन मध्यम श्रेणीत प्रगत वैशिष्ट्ये आणि शक्तिशाली कामगिरीचा दावा करतात. नवीनतम Pixel 9a स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर, तो AI-चालित कॅमेरा, दीर्घ बॅटरी लाइफ आणि सात वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्सना सपोर्ट करतो. त्याच वेळी, आयफोन 16e मध्ये शक्तिशाली Apple A18 चिप, प्रगत फोटोग्राफी वैशिष्ट्ये आणि Apple इकोसिस्टमचे फायदे आहेत.
दोन्ही फोन स्पेक्स आणि फीचर्सच्या बाबतीत एकमेकांना कडक स्पर्धा देतात यात शंका नाही. जर तुम्हाला गुगलच्या एआय-पॉवर्ड सॉफ्टवेअरचा आनंद घ्यायचा असेल, तर गुगल पिक्सेल 9a स्मार्टफोन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असेल. दुसरीकडे, जर तुम्हाला अॅपल इकोसिस्टमचा अनुभव घ्यायचा असेल आणि तुमचे बजेटही कमी असेल, तर आयफोन 16e तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल.