BSNL Recharge Plan: 365 दिवसांची व्हलिडीटी आणि किंमत 2 हजारांहून कमी... BSNL च्या सीनियर सिटिजन प्लॅनमध्ये मिळतात हे फायदे
सरकारी टेलीकॉम ऑपरेटर भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ने अलीकडेच त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला होता. हा रिचार्ज प्लॅन वरिष्ठ नागरिकांसाठी लाँच करण्यात आला होता. कंपनीने लाँच केलेल्या या रिचार्ज प्लॅनचे नाव सन्मान असे होते. हा रिचार्ज प्लॅन अशा लोकांसाठी लाँच करण्यात आला होता. ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे.
हा प्लॅन परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तब्बल 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. म्हणजेच एका रिचार्ज केल्यानंतर वर्षभर रिचार्ज करण्याची गरज नाही. कंपनीने हा प्लॅन अशा वरिष्ठ नागरिकांसाठी लाँच केला आहे, ज्यांना वारंवार त्यांचे सिम रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण होतात. चला या रिचार्ज प्लॅनबद्दल अधिक जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
BSNL च्या सम्मान रिचार्ज प्लॅनची किंमत 1812 रुपये ठेवण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना वर्षभराची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. त्यामुळे हा प्लॅन खरंच एक चांगली डील मानली जात आहे. याशिवाय, युजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, रोज 100 एसएमसएस आणि 2GB डेली डेटा सारखे बेनिफिट्स देखील ऑफर केले जातात. हा प्लॅन कंपनीच्या ऑफरचा भाग आहे आणि यूजर्सना फक्त 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत रिचार्ज करण्यासाठी उपलब्ध असेल. त्यामुळे, यूजर्सकडे विचार करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी अजूनही चांगला वेळ आहे.
नवीन युजर्ससाठी एक मोफत सिम कार्ड देखील बंडल केले जाते. बीएसएनएल त्यांची 1 रुपयांची ऑफर देखील सुरू ठेवत आहे, जी युजर्सना एक महिना मोफत मोबाइल सेवेसह मोफत 4जी सिम (फक्त नवीन ग्राहकांसाठी) देते. यामुळे युजर्सना सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनीच्या नव्याने अपग्रेड केलेल्या आणि सुरू झालेल्या 4जी सेवेचा अनुभव घेता येईल.
BSNL कोणती कंपनी आहे?
BSNL (Bharat Sanchar Nigam Limited) ही भारत सरकारची दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी आहे, जी लँडलाइन, मोबाइल, ब्रॉडबँड आणि इंटरनेट सेवा प्रदान करते.
BSNL कंपनीचे मोबाइल सिम कसे मिळवायचे?
तुम्ही जवळच्या BSNL स्टोअर किंवा अधिकृत रिटेलरकडून सिम कार्ड घेऊ शकता. मात्र यासाठी वैध ओळखपत्र (ID proof) आणि पत्त्याचे पुरावे आवश्यक आहेत.
BSNL ब्रॉडबँड प्लॅन कसे वापरायचे?
BSNL ब्रॉडबँड कनेक्शनसाठी तुम्ही BSNL ऑफिस किंवा ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करू शकता. कनेक्शन अॅक्टिव्ह झाल्यानंतर Wi-Fi राऊटर वापरून इंटरनेट सेवा सुरु करता येते.






