Recharge Plan: क्रिकेट फॅन्ससाठी खुशखबर! T20 विश्वचषक सामना पाहू शकता मोफत, हे आहेत Airtel, Jio आणि Vi चे स्वस्त प्लॅन
हा प्लॅन एक खास क्रिकेट डेटा प्लॅन आहे. कमी बजेट असणाऱ्या यूजर्ससाठी खास हा प्लॅन डिझाईन करण्यात आला आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह 5GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे
यामध्ये 30 दिवसांसाठी जिओहॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. तुम्हाला स्मार्टफोन किंवा टॅब्लेटवर मॅच पाहायची असेल तर तुम्ही हा प्लॅन खरेदी करू शकता. हा एक डेटा वाउचर आहे, त्यामुळे हा प्लॅन वापरण्यासाठी यूजर्सकडे एक सक्रिय बेस प्लॅन असणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीचा हा 44 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन एक अनोखा, कमी किंमतीत उपलब्ध असणारा पॅक आहे. या प्लॅनमध्ये 1GB डेटा केवळ एका दिवसासाठी दिला डाणाप आहे. या प्लॅनमध्ये संपूर्ण 30 दिवसांसाठी जिओहॉटस्टारचे सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते.
कंपनीच्या 100 रुपयांच्या डेटा पॅकमध्ये यूजर्सना 30 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह 6GB हाई-स्पीड डेटा ऑफर केला जातो. या डेटा पॅकसह 30 दिवसांचे जिओहॉटस्टारचे सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. जेणेकरून यूजर्स कुठूनही विश्वचषक सामन्यांची स्ट्रीमिंग सेवा वापरू शकतील. हा डेटा पॅक एक डेटा अॅड-ऑन आहे, याचा अर्थ असा की यूजर्सना हा डेटा पॅक वापरण्यासाठी त्यांच्या सिम कार्डवर अमर्यादित कॉलिंग प्लॅन असणे आवश्यक आहे.
ज्या यूजर्सना जास्तीचा डेटा आणि दिर्घकाळ अॅक्सेस पाहिजे असेल तर यूजर्स 195 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकतात. या प्लॅनमध्ये 15GB डेटा ऑफर केला जातो. यामध्ये 90 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. तसेच या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी जिओहॉटस्टारचे सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. ज्यांना संपूर्ण T20 विश्वचषक पहायचा आहे आणि त्यांना प्लॅटफॉर्मवर अपकमिंग बाइलेटरल सीरीज किंवा ओरिजिनल कंटेंट पाहण्याची सुविधा पाहिजे आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम आहे.






