OpenAI वर गंभीर आरोप! Google आणि Meta सोबत शेअर केला जातोय यूजर्सचा वैयक्तिक डेटा? कंपनीवर खटला दाखल; नेमकं प्रकरण काय?
दाखल करण्यात आलेल्या खटल्यानुसार, चॅटजीपीटी वेबसाईटवर असे ट्रॅकिंग टूल्स लावण्यात आले होते, जे यूजर्सच्या अॅक्टिव्हिटी रेकॉर्ड करत होते. यामध्ये मेटा पिक्सेल आणि गूगल ॲनालिटिक्स सारखे टूल्स समाविष्ट असल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. असा आरोप करण्यात आला आहे की, या टूल्सद्वारे यूजर्सची माहिती आपोआप गुगल आणि मेटापर्यंत पाठवली जात होती. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप ओपनएआयने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये असं म्हटलं आहे की, आज असे अनेक लोकं आहेत, जे AI चॅटबोट्सना त्यांच्या वैयक्तिक सल्लागाराप्रमाणे मानतात. यूजर्स एआय चॅटबोटसोबत आरोग्याविषयीचे प्रश्न, कायदेशीर बाबी, आर्थिक प्रकरणे आणि वैयक्तिक समस्या देखील शेअर करतात. याच कारणामुळे यूजर्सना अशी आशा असते की, त्यांची माहिती सुरक्षित राहावी आणि कोणासोबत शेअर केली जाऊ नये. मात्र आता करण्यात आलेल्या आरोपानंतर एआय चॅटबोट्सचा वापर करणाऱ्या यूजर्सच्या प्रायव्हसीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण हा प्रश्न करोडो लोकांच्या प्रायव्हसी आणि सुरक्षेचा आहे.
Instagram चं नवं Instants बनलंय डोक्याला ताप? कसं कराल बंद? फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस
मेटा पिक्सेल आणि गूगल ॲनालिटिक्स सारख्या टूल्सचा वापर वेबसाईटवरील ट्रॅफिक समजण्यासाठी आणि जाहिराती पाहण्यासाठी केला जातो. या टूल्समुळे समजत की, यूजर्स काय पाहत आहेत आणि यूजर्सना कोणत्या गोष्टीमध्ये जास्त आवड आहे. उदाहरणार्थ, जर कोणी इंटरनेटवर नवीन टीव्ही सर्च केलं आणि नंतर त्याला वेगवेगळ्या वेबसाइटवर टीव्हीच्या जाहिराती दिसू लागतात, तर अनेकदा अशाच प्रकारच्या ट्रॅकिंग सिस्टीम कार्यरत असतात. कंपनीवर करण्यात आलेले आरोप खरे सिद्ध झाले, तर याचा अर्थ असा होईल की, ChatGPT वर विचारलेल्या प्रश्नांचा वापर लोकांना टारगेटेड जाहिराती दाखवण्यासाठी केला गेला.






