(फोटो सौजन्य: Instagram)
काय आहे प्रकरण?
समोर आलेल्या वृत्तानुसार, पाच मित्र रिसॉर्टमध्ये थांबले होते आणि यावेळीच रिसाॅर्टच्या टाॅयलेटमध्ये त्यांना हे अजब-गजब दृष्य दिसून आले. पहिले तर मित्राने विचार केला की, टाॅयलेटमध्ये फ्लश नीट केले नसेल कारण त्याने सुरुवातील टाॅयलेटच्या आत काळी आकृती दिसली. त्यात घाण आहे असा विचार करत त्याने त्यात पाणी टाकले, परंतु काही वेळानेच त्याला टाॅयलेटमधून एक साप बाहेर निघताना दिसला. टाॅयलेटमध्ये असं सापाला पाहून व्यक्ती घाबरला आणि त्याने आलल्या मित्रांना याची माहिती दिली. सुरुवातीला त्यांना वाटलं की तो मस्करी करत असावा पण स्वत: सापाला टाॅयलेटमध्ये फिरताना पाहताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
व्हिडिओमध्ये घटनेचे संपूर्ण दृष्य कसे घडले ते पूर्णपणे दाखण्यात आले आहे. व्यक्ती काळी वस्तू पाहून काठीने त्याला वर खेचू पाहतो पण पुढच्याच क्षणी फणा काढून साप वर येतो ज्यानंतर व्यक्ती टाॅयलेट सीटपासून दूर पळू लागतो. माहितीनुसार, त्यांनी नंतर हाॅटेलला या घटनेची माहिती दिली होती. यात कुणालाही हानी झाली नाही फक्त मित्रांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ @cbsnews नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देत लिहिण्यात आले आहे की, ‘फिलिपिन्सच्या डॉन साल्वाडोर बेनेडिक्टो येथील एका रिसॉर्टमधील शौचालयातून किंग कोब्रा बाहेर आल्याचा थरारक क्षण एका हॉटेल पाहुण्याने चित्रित केला. त्या विषारी सापाला पकडून बाहेर काढण्यासाठी पाहुण्याने रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावले’.
व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “ते टॉयलेट सीट कोणीच पुसणार नाही का?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या व्हिडिओमधील प्रत्येक गोष्ट अस्वस्थ करणारी आहे. सगळीकडे मुंग्या आहेत आणि चक्क एक सापही… जमिनीवर सगळीकडे सांडलेल्या पाण्याबद्दल तर बोलायची गरजच नाही, हो ना?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे एका वाईट स्वप्नासारखं आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






