डिजि यात्राचा नवा विक्रम! तब्बल 19 दशलक्षांवर पोहोचली यूजर्सची संख्या, आता 6 प्रादेशिक भाषांमध्ये मिळणार सेवा
१९ दशलक्ष डाऊनलोड्स, २४ विमानतळांवर ३० टक्के अवलंबन आणि ७७ दशलक्षहून अधिक विनासायास प्रवासासह प्लॅटफॉर्म आता व्याप्ती, उपलब्धता व जागतिक एकीकरणामध्ये प्रबळ गतीसह २०२६ मध्ये प्रवेश करत आहे. २०२८ पर्यंत ८० टक्के अवलंन संपादित करण्याचे लक्ष्य प्लॅटफॉर्मने डोळ्यासमोर ठेवले आहे. डिजी यात्रेचा हा पाया अधिक मजबूत करण्यासाठी सहा प्रादेशिक भाषांमध्ये सेवा सुरु करण्यात आली आहे. ज्यामुळे भारतातील प्रत्येक प्रवाशासाठी विमान प्रवासाचा अनुभव अधिक सोपा झाला आहे. भाषिनीसोबत सहयोगाच्या माध्यमातून हे बहुभाषिक विस्तारीकरण लवकरच सर्व २२ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल, जे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या भाषेसंदर्भातील अडथळ्यांना दूर करण्याच्या आणि मेट्रो केंद्रांपलीकडे डिजिटल प्रवास अवलंबनाला गती देण्याच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देते. (फोटो सौजन्य – Pinterest)
डिजि यात्रा पहिल्या जागतिक वापरकर्त्याची नोंद केल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट-आधारित नोंदणी देखील सुरू करत आहे, ज्यासह एक्सपॅट्स, एनआरआय आणि परदेशी प्रवाशांना विनासायास प्रवास अनुभव मिळेल, जे लवकरच डिजिटल आयडेण्टिटी पडताळणी सेवा वापरू शकतील, ज्यासाठी मॅन्युअल तपासणीची गरज भासणार नाही. ही नवीन सेवा सुरू करण्यासाठी डिजि यात्रा वनआयडी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, ब्युरो ऑफ इमिग्रेशन, आयसीएओ आणि आयएटीएसोबत सहयोगाने काम करत आहे. हे सहयोग पासपोर्ट व व्हिसा-आधारित क्रेडेन्शियल शेअरिंग, ऑटोमेटेड बोर्डर कंट्रोल आणि पुढील आर्थिक वर्षासाठी नियोजित आंतरराष्ट्रीय पायलट ट्रायल्ससाठी आराखडा तयार करत आहेत.
ट्रॅव्हल आयडेण्टिटी व्यवस्थापनाव्यतिरिक्त डिजि यात्रा दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीसुविधा वाढविण्यावर भर देत आहे. यासाठी कंपनी आपली सेवा परिसंस्था विस्तारित करत आहे. प्लॅटफॉर्म आता प्रमुख एअरलाइन आणि इंडिगो, एअर इंडिया व मेकमायट्रिप अशा टॅव्हल टॅप्समधून प्रत्यक्ष बोर्डिंग पास शेअर करण्यास साह्य करतो, जेणेकरून विमानतळावर प्रवासादरम्यान बोर्डिंगसंदर्भात त्रास कमी होईल.
डिजि यात्रा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश खडकभावी म्हणाले, ”आज आम्हाला पाहायला मिळालेली गती भारतातील डिजिटल प्रवासामधील नवीन चॅप्टर आहे. आमची विविध भाषांमध्ये सादर करण्यात येणारी सेवा आणि आंतरराष्ट्रीय पायलट उपक्रमामधून प्रवासाला सोपे, अधिक सर्वसमावेशक आणि जागतिक स्तरावर इंटरऑपरेबल करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आम्हाला विविध देशांमधून व जागतिक विमान वाहतूक कंपन्यांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामधून प्रेरणा मिळत आहे, जे सुलभ प्रवासासाठी मॉडेल म्हणून डिजि यात्राला प्राधान्य देतात. मंत्रालय आणि सहयोगी एजन्सीजकडून दृढ पाठिंब्यासह आम्हाला आत्मविश्वास आहे की आगामी वर्षे अपेक्षेपेक्षा प्रगतीला गती देतील, भारताला जागतिक स्तरावर घेऊन जातील, जेथे ओळखीबाबत पडताळणी त्वरित, सुरक्षित आणि पूर्णत: प्रवासी-केंद्रित असेल.”
डिजि यात्रा आपल्या प्रायव्हसी-बाय-डिझाइन डिजिटल ओळख प्लॅटफॉर्मला विमानतळांपलीकडे विस्तारित करण्याचा देखील विचार करत आहे (व्यवस्थापनानंतर व नियामक मंजूरी), ज्यासह सुरक्षित हॉटेल चेक-इन आणि एन्क्रिप्टेड क्रेडेन्शियल्स व बायोमेट्रिक पडताळणीच्या माध्यमातून स्वयंचलित उपलब्धता शक्य होईल. प्रवासी उत्साहवर्धक अनुभवासाठी फेशियल-ऑथेन्टिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करत मॅन्युअल आयडी तपासण्या बायपास करू शकतात. प्लॅटफॉर्म म्युझियम्स, स्मारक आणि पर्यटन स्थळांमध्ये देखील या सेवेचा अवलंबन करण्याला चालना देत आहे, ज्यासह मर्यादित कनेक्टीव्हीटी किंवा लांब रांगा असलेल्या क्षेत्रांमध्ये सहजपणे तिकिटे मिळतील आणि अभ्यागतांचा अनुभव अधिक उत्साहित होईल. काळासह, आंतरराष्ट्रीय स्तरावर या मॉडेलचा विस्तार केल्यास परदेशातील भारतीयांसाठी प्रवास करणे सोपे होईल, तसेच भारताची पर्यटन उपस्थिती प्रबळ होईल, डिजि यात्रा गोपनीयता-संदर्भात प्रवास आणि नाविन्यपूर्ण आदरातिथ्याचे प्रमुख स्रोत बनेल. या सुधारणा डिजि यात्राच्या प्रबळ प्रायव्हसी-बाय-डिझाइन फ्रेमवर्कनुसार करण्यात येत आहेत, ज्याला विकेंद्रिकृत परिसंस्थेचे पाठबळ आहे, जी वापरकर्त्यांच्या डेटाचे संरक्षण आणि जागतिक डिजिटल ओळख नियमांचे अनुपालन होण्याची खात्री देते.






