ChatGPT चा वापर करताय? थांबा... चुकीनही विचारू नका या 5 गोष्टी, नाहीतर येईल मोठं संकट
टेक कंपनी ओपनएआयने 2022 मध्ये जगातील पहिलं AI चॅटबोट ChatGPT लाँच केलं. ChatGPT ने कमी कालावधीतच अधिक प्रसिद्धि मिळवली. ChatGPT च्या मदतीने आपण आपली अनेक कामं पूर्ण करू शकतो. आपल्या अनेक प्रश्नांची उत्तर मिळवू शकतो. प्रश्न ऑफीसचा असो किंवा शाळा- कॉलेजचा, ChatGPT कडे सर्व प्रश्नांची उत्तर असतात. आपण स्वत: दिवसातून 10 वेळा ChatGPT सर्च करतो.
एका अहवालानुसार, हे टूल प्रत्येक दिवशी सुमारे 1 अब्जवेळा सर्च केले जाते. ज्यामुळे आता याची तुलना थेट गुगलसोबत केली जात आहे. मराठी, हिंदी, इंग्रजीसह ChatGPT शेकडो भाषांमध्ये त्यांच्या युजर्ससोबत संवाद साधू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) द्वारे चालवालं जाणारं चॅटबोट ChatGPT आज राइटिंग, कोडिंग, रिसर्च आणि कस्टमर सर्विस सारख्या अनेक कामांत मदत करत आहे. मात्र तरी देखील अशा काही गोष्टी आहेत, ज्याबाबत ChatGPT ला विचारणं किंवा त्याचा सल्ला घेणं धोकादायक ठरू शकतं. (फोटो सौजन्य – Pinterest)
ChatGPT युजर्सनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मात्र याचा अर्थ असा नाही की, ChatGPT ने दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर योग्य असतात. ChatGPT तुम्हाला आरोग्याविषयी सल्ले देखील देऊ शकतो मात्र याचा अर्थ असा नाही की, तो तुमचा डॉक्टर बनू शकतो. कधीकधी डॉक्टरकडे जाणे त्रासदायक वाटते, त्यामुळे आपण ChatGPT चा सल्ला घेतो. मात्र असं करणं धोकादायक ठरू शकतं. रोगाचे निदान आणि उपचार करण्यासाठी, फक्त खऱ्या डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो. ChatGPT कडून आरोग्य टिप्स घेणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ChatGPT ला एखाद्याचे सोशल मीडिया किंवा ईमेल कसे हॅक करायचे हे विचारू शकता, तर तुम्ही चुकीचे आहात. हॅकिंग बेकायदेशीर आहे, आणि ChatGPT सारख्या AI टूल्सना अशी माहिती देण्यास मनाई आहे. तुम्ही ChatGPT ला हॅकिंगबाबत प्रश्न विचारले तर तो उत्तर देण्यासाठी सक्तीने नकार देईल.
कायदेशीर बाबींची गुंतागुंत आणि गांभीर्य पाहता, ChatGPT कडून घेतलेला कायदेशीर सल्ला तुमच्यासाठी चुकीचा ठरू शकतो. जोपर्यंत प्रकरण सामान्य माहितीपुरते मर्यादित आहे तोपर्यंत ते ठीक आहे, परंतु कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी वकिलाचा सल्ला घेणे शहाणपणाचे ठरेल. ChatGPT कडून कायदेशीर सल्ला घेणं योग्य नाही.
जर तुम्ही ChatGPT कडून शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित सल्ले घेत असाल तर वेळीच थांबा. यामुळे तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. AI-आधारित माहिती कधीकधी अपूर्ण किंवा जुन्या डेटावर आधारित असू शकते, यामुळे सल्ला घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. आर्थिक किंवा गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्यापूर्वी, आर्थिक तज्ञाकडून किंवा स्वतःहून माहिती गोळा करून निर्णय घेणे चांगले होईल.
जर तुम्ही ChatGPT ला बॉम्ब कसा बनवायचा यासारखी धोकादायक माहिती विचारण्याचा प्रयत्न केला तर चॅटबोट तुम्हाला उत्तर देण्यास नकार देईल. हे टूल सुरक्षा आणि नीतिमत्तेचे काटेकोरपणे पालन करते आणि कोणत्याही प्रकारची हिंसक किंवा बेकायदेशीर माहिती देण्यास स्पष्टपणे नकार देते.