गुगल पिक्सेलने चुकून दाखवले नवे मॉडेल्स (फोटो सौजन्य - Google)
असे दिसते की गुगलने त्यांच्या आगामी Pixel 10 मालिकेतील सर्व मॉडेल्स अनावधानाने अनावरण केले आहेत. हो, अधिकृत लाँचिंगच्या सुमारे एक महिना आधी, नवीन मालिकेत काय नवीन असेल याची पुष्टी झाली आहे. खरं तर, अँड्रॉइड ऑथॉरिटीच्या अहवालानुसार, Google Play Store च्या Android आवृत्तीवर काही काळासाठी एक प्रमोशनल बॅनर दिसला होता, ज्यामध्ये या नवीन Pixel 10 मध्ये येणारे चार नवीन डिव्हाइसेस उघड झाले होते. प्रमोशनल बॅनरमध्ये Pixel 10, Pixel 10 Pro, Pixel 10 Pro XL आणि Pixel 10 Pro Fold दिसले आहेत.
गुगल पिक्सेल फोन वापरणाऱ्यांना आणि चाहत्यांना गुगलच्या या एका चुकीमुळे नवे मॉडेल्स पाहण्याची संंधी मिळाली आहे. मात्र आता चाहत्यांची उत्सुकतादेखील वाढली आहे. नक्की याचे चार मॉडेल्स कसे असणार याबाबत अधिक माहिती आपण घेऊया (फोटो सौजन्य – Google)
बॅनरमध्ये दिसणाऱ्या चारही स्मार्टफोन्सची पहिली झलक
कशी आहे Google Pixel 10 Series ची पहिली झलक (फोटो सौजन्य – कशी आहे Google Pixel 10 Series ची पहिली झलक (फोटो सौजन्य – Google)
हे बॅनर प्ले स्टोअरच्या नियमित इंटरफेसवर दिसले नाही, परंतु अहवालांमध्ये असा दावा केला जात आहे की हे चित्र काही तांत्रिक बिघाडामुळे समोर आले आहे. या नवीन बॅनरवर ‘Meet the new Pixel 10 Series’ असे लिहिले आहे आणि त्यात चारही हँडसेट दिसत आहेत. या सुरुवातीच्या झलकवरून आपल्याला फोनची रचना कशी असेल याची कल्पना येते. विशेष म्हणजे समोर आलेला फोटो गेल्या काही आठवड्यात आलेल्या टीझरशी खूप मिळताजुळता दिसतो. तथापि, गुगलने अद्याप अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही.
Google Pixel 10 सिरीजमध्ये काय नवीन असेल?
गुगल पुढील महिन्यात २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘Made By Google’ कार्यक्रमात Pixel 10 सिरीज लाँच करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, यावेळी बेस Pixel 10 मध्ये तिसरा रियर कॅमेरा मिळू शकतो, जो गुगलच्या नॉन-प्रो मॉडेल्समध्ये पहिला असेल. यासोबतच, कंपनी गुगलचा लेटेस्ट कस्टम सिलिकॉन, Pixel 10 प्रो आणि Pixel 10 Pro XL मध्ये टेन्सर जी५ चिपसेट देऊ शकते.
फोटो एडिंटिंग आता फुल ऑटोमॅटिक, Google Photos बरोबर जबरदस्त AI फिचर्स
Pixel 10 Pro XL मध्ये मोठी बॅटरी
बॅटरीच्या बाबतीत, यावेळी Pixel 10 Pro XL हा एक मजबूत बॅटरी असलेला स्मार्टफोन बनू शकतो. डिव्हाइसमध्ये ५,२०० एमएएचची मोठी बॅटरी असू शकते, जी कोणत्याही पिक्सेल डिव्हाइसमध्ये आढळणारी सर्वात मोठी बॅटरी असू शकते. यावेळी स्टँडर्ड प्रो मॉडेलमध्ये ४,८७० एमएएचची बॅटरी देखील असू शकते. तथापि, यावेळी पिक्सेल १० प्रो आणि प्रो एक्सएल दोन्ही मागील मॉडेल्सच्या ६.३ इंच आणि ६.८ इंच स्क्रीन आकारात येऊ शकतात.
Smartphone Leaks: Google च्या अपकमिंग स्मार्टफोनचे फिचर्स लीक, अशी असणार डिझाईन… लाँच डेट जाणून घ्या
पहा व्हिडिओ