जुन्यात जुना व्हिडिओही दिसेल हाय-क्वालिटीमध्ये! (Photo Credit - X)
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये होत असलेल्या विकासामुळे आता कोणत्याही जुन्या आणि कमी क्वालिटीच्या व्हिडिओची गुणवत्ता वाढवणे शक्य झाले आहे. यासाठी खास मॉडेल डिझाइन केले जाते, जे पॅटर्न रिकग्निशन अल्गोरिदमचा (Pattern Recognition Algorithm) वापर करून इमेज आणि व्हिडिओमधील तपशील वाढवते. हे फीचर आल्यानंतर YouTube वर असलेले सगळे व्हिडीओ अपस्केल केले जातील, ज्यामुळे ते अधिक शार्प आणि तपशीलवार दिसतील. याचा सर्वात जास्त परिणाम टीव्हीसारख्या मोठ्या स्क्रीन्सवर दिसेल.
युजर्स हेदेखील पाहू शकतील की एखादा व्हिडीओ अपस्केल्ड रिझोल्यूशनवर (Up-scaled Resolution) चालत आहे की नाही. त्यांना मूळ (Original) रिझोल्यूशनवर व्हिडीओ पाहण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. सध्या हे फीचर १०८०p पेक्षा कमी रिझोल्यूशनवर अपलोड झालेल्या व्हिडिओंसाठी रोल आऊट केले जात आहे. लवकरच HD व्हिडिओंनाही अपस्केल करण्याचा पर्याय येईल.
YouTube वर आता जुगार आणि हिंसक गेमिंगशी संबंधित कंटेटचे नियम अधिक कठोर होणार आहेत. Google च्या मालकीच्या या प्लॅटफॉर्मने सांगितले आहे की, १७ नोव्हेंबर २०२५ पासून ते NFTs (नॉन-फंजिबल टोकन्स) सारख्या डिजिटल वस्तूंसोबत जुगाराचे व्हिडीओ प्रतिबंधित करेल. तसेच, कॅसिनो-शैलीतील किंवा हिंसक गेमिंग असलेल्या कंटेटवर वयोमर्यादा लागू केली जाईल.






