फोटो सौजन्य: iStock
भारताची आघाडीची टेलिकॉम कंपनी Vodafone Idea ने आपल्या वी ॲपवरील वी गेम्स प्लॅटफॉर्मवर एक अनोखी ऑफर सुरु केली आहे. “गॅलेक्सी शूटर्स फ्रीडम फेस्ट” नावाची ही स्पेशल एडिशन ३१ ऑगस्टपर्यंत लाईव्ह राहणार आहे. यात वी युजर्सना गेमिंग, मनोरंजन आणि खास रिवॉर्ड्स यांचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळतो आहे.
आज भारतातील मोबाईल गेमिंग मार्केट झपाट्याने वाढत आहे. अहवालांनुसार, हे क्षेत्र २०२५ पर्यंत तब्बल ७.५ ते ८.७५ बिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर वी ने सुरु केलेले फ्रीडम फेस्ट हे ग्राहकांना डिजिटल मनोरंजनाचा अनुभव देतानाच प्रचंड आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देते. विशेष म्हणजे, शूटर गेम्स हे जगभरात लोकप्रिय असतात, आणि त्यातच गॅलेक्सी शूटर्स सारख्या खेळाची फेस्टिव्हल एडिशन ग्राहकांसाठी वेगळीच मजा घेऊन येते.
या स्पर्धेत सहभागी होऊन वी ग्राहकांना अनेक उत्तम बक्षिसे मिळवण्याची संधी आहे. यात सर्वात आकर्षक ऑफर म्हणजे ४९९९ रुपयांचे वार्षिक रिचार्ज फक्त १ रुपयात जिंकण्याची संधी! या रिचार्जमध्ये Amazon Prime Video सह तब्बल १९ OTT प्लॅटफॉर्म्सचा ॲक्सेस (Sony Liv, Zee5, Lionsgate Play, FanCode इ.) वी मुव्हीज अँड टीव्ही सुपर सबस्क्रिप्शनचा भाग म्हणून मिळतो. त्याशिवाय, संपूर्ण वर्षभरासाठी दर दिवशी २ जीबी डेटा मोफत मिळणार आहे.
५० जीबी डेटा पॅक फक्त १ रुपयात (२८ दिवस वैधता).
वी मुव्हीज अँड टीव्ही सुपर सबस्क्रिप्शन फक्त १ रुपयात, त्यात १० जीबी डेटा आणि १९ ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा ऍक्सेस.
५० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर
स्पर्धेत सहभागी होण्याची पद्धतही सोपी आहे. ग्राहकांनी वी ॲपवर लॉगिन करून वी गेम्स सेक्शनमध्ये जावे आणि दररोज खेळ खेळून जेम्स जिंकावे. किती जेम्स मिळाले यावर ग्राहकांची बक्षिसे ठरतील. महत्त्वाचे म्हणजे ही स्पर्धा दररोज रीसेट होते, त्यामुळे दररोज नवी संधी मिळते.
विचार तुम्ही करा आणि लिहिणार AI! ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी तयार केले अनोखी टोपी, अशी करणार काम
फक्त गॅलेक्सी शूटर्सच नाही तर वी गेम्समध्ये Fruit Merge, Archery, Bubble Shooter, Solitaire Pro, Cricket Bash, Quick Carrom, Word Game, Cannon Blast, Stack Bounce असे अनेक आकर्षक गेम्सदेखील आहेत. यामुळे युजर्सना गेमिंगसोबतच मनोरंजनाचा भरपूर डोस मिळतो.
विजेत्यांची घोषणा वी ॲपवर करण्यात येईल आणि त्यांना बक्षिसांसाठीची लिंक एसएमएसवर पाठवली जाईल. वी गेम्समध्ये सध्या ॲक्शन, आर्केड, पझल आणि स्ट्रॅटेजी अशा वेगवेगळ्या शैलींचे कॅज्युअल तसेच प्रीमियम गेम्स उपलब्ध आहेत.
एकंदरीत, “गॅलेक्सी शूटर्स फ्रीडम फेस्ट” हा उपक्रम VI च्या डिजिटल ऑफरिंगला नवे परिमाण देतो आहे. नाविन्यपूर्ण कंटेन्टसोबत मोठी बक्षिसे जिंकण्याचा आनंद ग्राहकांना मिळतो आहे आणि त्यामुळे कंपनीचे ग्राहकांसोबतचे नाते अधिक मजबूत होत आहे.