Nubia Z80 Ultra: गेमिंग स्मार्टफोन्सचा बाप आला! AI फीचर्स आणि क्रेझी परफॉर्मन्स पाहून युजर्स होतील वेडे, इतकी आहे किंमत
टेक कंपनी Nubia चा नवीन फ्लॅगशिप आणि गेमिंग स्मार्टफोन अखेर लाँच करण्यात आला आहे. हा गेमिंग स्मार्टफोन Nubia Z80 Ultra या नावाने लाँच करण्यात आला आहे. या फ्लॅगशिप हँडसेटमध्ये 144Hz रिफ्रेश रेट, अल्ट्रा फास्ट टच सँपलिंग आणि आई प्रोटेक्शन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Nubia Z80 Ultra या स्मार्टफोनमध्ये 7,200mAh ची मोठी बॅटरी, AI-असिस्टेड कॅमेरा सिस्टम आणि प्रोफेशनल गेमिंगसाठी खास फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
Nubia Z80 Ultra हा स्मार्टफोन 12GB + 512GB, 16GB + 512GB आणि 16GB + 1TB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,999 म्हणजेच सुमारे 61,600 रुपये, 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,299 म्हणजेच सुमारे 65,300 रुपये, 16GB + 1TB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 5,699 म्हणजेच सुमारे 70,200 रुपये आहे. हे डिव्हाईस फँटम ब्लॅक आणि कंडेंस्ड लाइट व्हाइट कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
Nubia Z80 Ultra teardown
Rear view #Nubia #NubiaZ80Ultra
1/13 🧵 pic.twitter.com/Q4FafNXqgn — Tech Home (@TechHome100) October 22, 2025
फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये 6.85-इंच 2K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये X10 अंडर-स्क्रीन ल्यूमिनस मटीरियल, 144Hz चा रिफ्रेश रेट आहे. ज्यामुळे हे डिव्हाईस आणखी प्रिमियम बनते. हे डिव्हाईस SGS लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन आणि AI ट्वाइलाइट आई प्रोटेक्शनने सुसज्ज आहे. कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. या डिव्हाईसमध्ये अँड्रॉइड 16-बेस्ड MyOS 16 देण्यात आला आहे.
गेमिंगसाठी हा स्मार्टफोन एक चांगली निवड ठरणार आहे. या स्मार्टफोनमध्ये असलेले रेड मॅजिक क्यूब इंजिन गेमिंगसाठी अतिशय उत्तम आहे. तर सुपर-लार्ज 3D आइस स्टील VC वाला कंपोजिट लिक्विड मेटल कूलिंग सिस्टम गेमिंगदरम्यान फोनची हिट कमी करण्यसाठी मदत करतो. हे हँडसेट युजर्सना Synopsys Touch IC आणि फिजिकल गेमिंग कीजद्वारे प्रोफेशनल लेवलप्रमाणे कंट्रोल करण्यासाठी मदत करते.
कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर Nubia Z80 Ultra खूप खास आहे. कारण या डिव्हाईसमध्ये Neovision Taishan AI इमेजिंग 5.0 सिस्टम देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेलचा लाइट एंड शॅडो मास्टर 990 फ्लॅगशिप कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 64-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस देखील आहे. या डिव्हाईसमध्ये एक 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस देखील देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. याशिलाय या स्मार्टफोनमध्ये 7,200mAh बॅटरी आणि 90W वायर्ड आणि 80W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.






