Google आणि Samsung ची अनोखी भेट! लवकरच लाँच करणार Smart glasses, लाईव्ह ट्रांसलेशनपासून मेमोरी रिकॉलपर्यंत मिळणार हे फीचर्स Google आणि Samsung ची अनोखी भेट! लवकरच लाँच करणार Smart glasses, लाईव्ह ट्रांसलेशनपासून मेमोरी रिकॉलपर्यंत मिळणार हे फीचर्स
जगातील मोठ्या टेक कंपन्या गुगल आणि सॅमसंगने त्यांच्या ग्राहकांसाठी आतापर्यंत अनेक नवीन डिव्हाईस लाँच केले आहेत. ज्यामध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच, ईअरबड्स, अशा अनेक डिव्हाईसचा समावेश करण्यात आला आहे. गुगल आणि सॅमसंगचे डिव्हाईस ग्राहकांना एक वेगळाच अनुभव देतात. आता या दोन्ही कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी एक मोठं आणि अनोखं गिफ्ट घेऊन येणार आहेत. हे नवीन गिफ्ट कोणता स्मार्टफोन किंवा स्मार्टवॉच नाही तर स्मार्ट ग्लासेस असणार आहे.
गुगल आणि सॅमसंग त्यांच्या लाखो ग्राहकांसाठी भागिदारी केली असून आता या कंपन्या अँड्रॉइड एक्सआर स्मार्ट ग्लासेस लाँच करणार आहेत. अलीकडील एका अहवालात असे समोर आले आहे की दोन्ही कंपन्या 2026 पर्यंत हे ‘अनोखे ग्लासेसे’ लाँच करू शकतात. हा प्रकल्प एआर आणि एक्सआरच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. या ग्लासेसमध्ये तुम्हाला लाईव्ह ट्रांसलेशनपासून मेमोरी रिकॉलपर्यंत अनेक फीचर्स मिळणार आहेत. दोन्ही कंपन्यांच्या भागिदारीनंतर त्यांच्या ग्राहकांसाठी हे अनोखं गिफ्ट असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कोरियन इकॉनॉमिक डेलीमधील एका वृत्तानुसार, स्मार्ट ग्लास गुगलद्वारे चालवला जाईल तर सॅमसंग हार्डवेअर उत्पादन आणि मार्केटिंग हाताळेल. गुगलने या स्मार्ट ग्लासेसचा प्रोटोटाइप आधीच सादर केला आहे, ज्याची पहिली झलक TED2025 परिषदेत पाहायला मिळाली. या दरम्यान, या अनोख्या चष्म्यात उपलब्ध असलेल्या अनेक प्रगत वैशिष्ट्यांबद्दलही सांगण्यात आले. या स्मार्ट ग्लासेसचे फीचर्स देखील त्याच्या नावाप्रमाणेच अगदी स्मार्ट आहेत. म्हणजेच युजर्सना या स्मार्ट ग्लासेसमध्ये अनोखे आणि युनिक फीचर्स पाहायला मिळणार आहेत.
लाईव्ह ट्रान्सलेशन: पहिल्या फीचरबद्दल बोलायचे झाले तर, या अँड्रॉइड एक्सआर ग्लासमध्ये तुम्हाला लाईव्ह ट्रान्सलेशनचे फीचर दिलं जाणार आहे. या फीचरबद्दल सोप्या शब्दांत सांगायचे तर, या वैशिष्ट्याच्या मदतीने तुम्ही रिअल टाइममध्ये ट्रान्सलेशन करू शकता. याचा अर्थ असा की जर कोणी तुम्हाला काही सांगितले तर तुम्ही त्याचे ट्रान्सलेशन या चष्म्यांमध्ये रिअल टाइममध्ये पाहू शकाल.
मेमरी रिकॉल: एकदा पाहिल्यानंतर तुम्ही देखील त्याबाबत विसरत असालच. परंतु या अनोख्या चष्म्यांमध्ये मेमरी रिकॉल वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला अलीकडे पाहिलेले चांगले दृश्य पुन्हा पाहण्याची परवानगी देते. ज्या लोकांना सतत काही ना काही विसरण्याची सवय असते त्यांच्यासाठी हे फीचर अतिशय बेस्ट असणार आहे.
प्रगत नेव्हिगेशन: एकदा तुम्ही हे ग्लासेस घातल्यानंतर, तुम्हाला फोनवरील नकाशा पुन्हा पुन्हा पाहण्याची आवश्यकता नाही, तुम्ही तुमच्या चष्म्यातून थेट नेव्हिगेशन पाहू शकाल, जे टोनी स्टार्कच्या आयर्न मॅन सूटची आठवण करून देते.
अँड्रॉइड इंटिग्रेशन: एवढेच नाही तर या चष्म्यांना अनेक अँड्रॉइड अॅप्स आणि गुगल सेवांचा सपोर्ट देखील असेल ज्यामुळे ते आणखी अद्भुत होतील.
मागील अहवालांमध्ये असे म्हटले जात होते की हे चष्मे 2025 च्या अखेरीस लाँच केले जाऊ शकतात, परंतु आता अलीकडील अहवालात असे म्हटले आहे की त्यांचे पूर्ण रिलीज 2026 मध्ये होऊ शकते. या अनोख्या चष्म्यांच्या निर्मिती आणि प्रमोशनमध्ये सॅमसंग प्रमुख भूमिका बजावेल.