(फोटो सौजन्य: Pinterest)
फॅक्टरी रिसेट प्रोटेक्शनमध्ये सुधारणा
चोर अनेकदा फोन फॉरमॅट करून विकण्याचा प्रयत्न करतात. मात्र नवीन सुरक्षा अपडेटमुळे तुमच्या परवानगीशिवाय किंवा गुगल क्रेडेंशियल्सशिवाय फोन फॅक्टरी रिसेट करणे आता अत्यंत कठीण झाले आहे. यामुळे चोरीचा फोन बाजारात विकणे चोरांसाठी कठीण होईल.
एआय ‘स्नॅच डिटेक्शन
गुगलने यामध्ये प्रगत एआयचा वापर केला आहे. जर कोणी तुमच्या हातातून फोन हिसकावून धावण्याचा, गाडीवर किंवा कारमधून वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला तर फोनमधील सेन्सर्स ही ‘हिसकावण्याची हालचाल’ ओळखतात. अशी हालचाल आढळताच स्क्रीन आपोआप लॉक होते.
ऑफलाईन डिव्हाइस लॉक
अनेकदा चोर फोन चोरल्यानंतर लगेच तो इंटरनेटपासून डिस्कनेक्ट करतात किंवा एअरप्लेन मोडवर टाकतात जेणेकरून जर एखाद्या चोराने तुमचा मोबाइल करण्यासाठी वारंवार चुकीचा पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न टाकला तर नवीन Failed Authenti-cation Lock फीचर सक्रिय होते. ठराविक वेळा चुकीचे प्रयत्न झाल्यास फोन आपोआप पूर्णपणे लॉक होतो, ज्यामुळे चोराला तुमच्या वैयक्तिक डेटापर्यंत पोहोचणे अशक्य होते. गुगल ब्लॉगनुसार हे फिचर ‘ब्रूट फोर्स’ हल्ल्यांपासून संरक्षण देते. त्याला ट्रॅक करता येऊ नये. मात्र नवीन अपडेटनुसार जर तुमचा फोन बराच वेळ इंटरनेटपासून डिस्कनेक्ट राहिला तर तो सुरक्षिततेसाठी आपोआप लॉक होतो.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






