चोरी होताच आपोआप Lock होईल फोन! डिव्हाइस अन् डेटा राहील सेफ; आजच ऑन करा ही सेटिंग
आजच्या युगात स्मार्टफोन चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र, स्मार्टफोनची चोरी पूर्णपणे रोखू शकेल, असे कोणतेही साधन किंवा सेवा अद्याप तयार करण्यात आलेली नाही. परंतु, Android OS मध्ये काही इन-बिल्ट फीचर्स आहेत जी तुमचा फोन आणि त्यात साठवलेला डेटा सुरक्षित ठेवण्यास तुमची मदत करतात. गुगलची नवीन थेफ्ट प्रोटेक्शन सर्व्हिस (Theft Protection Service) असेच एक सेक्युरिटी फिचर आहे, जे तुमचा स्मार्टफोन पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवते.
सध्याच्या चोरीच्या वाढत्या घटना बघता आपल्या स्मार्टफोनची विशेष काळजी घेणे फार गरजेचे बनले आहे. तुम्हालाही तुमचा स्मार्टफोन सुरक्षित ठेवायचा असल्यास आजच आपल्या फोनमध्ये ही सेटिंग ऑन करा. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. ते कसे करता येणार हे आज आम्ही तुम्हाला या लेखात स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत.
मृत्यूनंतरही तुमचे Facebook-Instagram डिटेल्स राहतील सेफ, आजच ऑन करा ही सेटिंग
गुगलची थेफ्ट प्रोटेक्शन सर्विस काय आहे?
Google चे थेफ्ट प्रोटेक्शन हे एक इन-बिल्ट सेक्युरिटी फिचर आहे जे Android 10 आणि त्यावरील व्हर्जनवर चालणाऱ्या स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. स्मार्टफोन चोरीला गेल्यास युजरचा डेटा सुरक्षित ठेवणे हा या सर्विसचा उद्देश आहे.
थेफ्ट डिटेक्शन लॉक (Theft Detection Lock)
फोन बळजबरीने हिसकावला जात आहे किंवा कोणीतरी तो घेऊन पळून जात असल्याचे आढळल्यास, स्क्रीन आपोआप लॉक होईल
ऑफलाइन डिवाइस लॉक (Offline Device Lock)
फोन ऑफलाइन झाल्यास, काही वेळाने स्क्रीन आपोआप लॉक होईल. ते अनलॉक करण्यासाठी पासवर्ड आवश्यक असेल.
थेफ्ट प्रोटेक्शन फिचर कसे मदत करते?
या फीचरच्या मदतीने यूजर्स फोन चोरीला गेल्यास तुम्ही तो दुरूनच लॉक करू शकतात. याव्यतिरिक्त, Google च्या Find My Device सर्व्हिसचा वापर करूनही आपल्या हरवलेल्या डिव्हाइसचा मागोवा घेतला जाऊ शकतो आणि त्याचा डेटा मिटवला जाऊ शकतो.
WhatsApp polls: आता व्हॉट्सॲप पोलमध्ये ॲड करता येणार फोटो, कसे काम करेल? जाणून घ्या
फोनमध्ये अशाप्रकारे ऑन करा सेटिंग