WhatsApp polls: आता व्हॉट्सॲप पोलमध्ये ॲड करता येणार फोटो, कसे काम करेल? जाणून घ्या
व्हॉट्सॲप हे जगभरात वापरले जाणारे फेमस मेसेजिंग ॲप आहे. व्हॉट्सॲपवर युजर्ससाठी अनेक फीचर्स जोडले गेले आहेत. यातीलच एक म्हणजे पोल फिचर, याद्वारे तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पोल पाठवू शकता. त्यातच आता व्हॉट्सॲप या पोल फीचरमध्ये काही बदल करणार असल्याचे समजत आहे. अशा परिस्थितीत व्हॉट्सॲप पोल्स फीचरचा अनुभव पूर्वीपेक्षा चांगला असण्याची अपेक्षा आहे.
वास्तविक, व्हॉट्सॲपने 2022 मध्ये पहिल्यांदा पोल फीचर सादर केले होते. तेव्हापासून व्हॉट्सॲप पोल फीचरमध्ये सातत्याने बदल केले जात आहेत, मात्र आता पोल फीचरमध्ये फोटो टाकण्याची सुविधा दिली जाऊ शकते. म्हणजेच पूर्वी जिथे आपण पोलमध्ये फक्त टेक्स्ट टाकत होतो तिथे आता आपल्याला फोटो देखील ॲड करता येणार आहे. हे फिचर केव्हा रिलीज केले जाईल आणि याचा वापर कसा करता याविषयी काही सविस्तर बाबी जाणून घेऊयात.
आता लॅपटॉप-मॉनिटर-प्रिंटर 10 मिनिटांत घरी पोहोचणार, Blinkit घोषणा, या शहरांमध्ये उपलब्ध होणार सेवा
प्रथम चॅनेलसाठी फिचर रिलीज करण्यात येईल
दरम्यान व्हॉट्सॲपचे हे फीचर सध्या चॅनेलवर रिलीझ केले जात आहे, तर ग्रुप आणि पर्सनल संभाषणांमधील पोल ऑप्शनमधील फोटो फीचर नंतर रिलीझ केले जाईल.
युजर्सना मिळणार फोटोची सुविधा
WABetaInfo च्या लेटेस्ट अहवालानुसार, WhatsApp Beta Android व्हर्जन 2.25.1.17 अपडेटमध्ये नवीन फीचर्सची माहिती देण्यात आली आहे, त्यानुसार नवीन अपडेटमध्ये यूजर्सना पोल ऑप्शनमध्ये फोटोची सुविधा मिळेल. म्हणजे पोल फीचरमध्ये मजकुराऐवजी फोटो दिसेल.
मिळणार धमाकेदार व्हिज्युअल्स
रिपोर्टनुसार, हे फीचर आगामी अपडेटमध्ये रिलीज केले जाऊ शकते, जे सध्या बीटाचा एक भाग आहे. यामध्ये यूजर्सना फोटो निवडण्याची आणि पोलमध्ये फोटो टाकण्याची सुविधा मिळणार आहे. याचा अर्थ तुम्ही प्रत्येक पोल ऑप्शनमध्ये एक खास फोटो टाकू शकाल. हे तुम्हाला एक उत्तम व्हिज्युअल एक्सपीरियन्स देईल.
युजर एंगेजमेंट वाढवण्यास होईल मदत
अनेकदा दिसून येते की, कोणताही आर्ट किंवा डिजाइन शेअर करताना मजकूर लिहिण्यात अडचण निर्माण होते. अशा प्रसंगासाठी फोटो हा एक चांगला पर्याय असू शकतो. नवीन फिचर व्हिज्युअल एक्सपीरियन्स सुधारेल. तसेच लोकांचा सहभाग वाढण्यास मदत होईल.
POCO X7 Series: जबरदस्त Durability सह पोको कंपनीची X7 सिरीज लाँच! फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
केव्हा जारी केले जाईल नवीन फिचर
WABetaInfo नुसार, हे फिचर सध्या विकासाच्या टप्प्यात आहे, जे लवकरच रिलीज होऊ शकते. मात्र, कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत, युजर्सने ऑफिशियल लाँचची प्रतीक्षा करावी.व्हॉट्सॲपने आपल्या पोल फीचरमध्ये नवीन अपडेट आणण्याची तयारी केली आहे. आता तुम्ही पोलमध्ये केवळ मजकूरच नाही तर फोटो देखील जोडू शकाल. हे फिचर सध्या बीटा टेस्टिंगमध्ये आहे आणि लवकरच सर्व युजर्ससाठी उपलब्ध केले जाईल.