iPhone 17 Series launch: आगामी आयफोन सिरीज लाँचपूर्वीच स्वस्त झाला iPhone 15, अॅमेझॉन - फ्लिपकार्टवर किती आहे किंमत?
Apple iPhone 17 Event 2025: 9 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये टेक जायंट कंपनी अॅपल त्यांच्या आगामी आयफोन 17 सिरीजसह अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच करणार आहे. या आगामी आयफोनबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. जसे की, या आयफोन सिरीजमध्ये कोणते मॉडेल्स उपलब्ध असणार आहेत, त्यांची किंमत किती असणार आहे आणि त्यांचे फीचर्स काय असू शकतात. आगामी आयफोन सिरीजची चर्चा सुरु असतानाच आता ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
आयफोन 17 लाँच होण्यापूर्वीच आयफोन 15 ची किंमत कमी झाली आहे. कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून नवीन आयफोन लाँच होताच जुन्या आयफोनची किंमत कमी करते. त्यामुळे जे लोकं आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असतात, त्यांच्यासाठी हि एक उत्तम संधी असते. आता देखील नवीन आयफोन लाँच होण्यापूर्वी जुन्या आयफोन 15 ची किंमत कमी झाली आहे. आयफोन 15 च्या नवीन किंमती काय आहेत, लोकं हा आयफोन किती रुपयांत खरेदी करू शकतात, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
2023 मध्ये कंपनीने आयफोन 15 हा 79,900 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. गेल्या वर्षी कंपनीने या आयफोनच्या किंमतीत 10,000 रुपयांची कपात केली होती. त्यामुळे या मॉडेलची किंमत 69,900 रुपये झाली होती. आता नवीन आयफोन 17 सिरीज लाँच होण्यापूर्वी कंपनीने पुन्हा एकदा आयफोन 15 ची किंमत 5000 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे ग्राहक आता हा आयफोन 15 फ्लिपकार्टवरून 64,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकतात.
हे मॉडेल अमेझॉनवरून लाँच किमतीपेक्षा 20 हजार रुपयांनी कमी किमतीत खरेदी करता येईल. आयफोन 15 अमेझॉनवरून 59,900 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनवर 1,797 रुपयांची बँक सूट दिली जात आहे. या ऑफरसह, तो 58,103 रुपयांना खरेदी करता येईल.
iPhone 15 स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 1179 x 2556 पिक्सेल आहे. या फोनची स्क्रीन Dolby Vision आणि HDR10 सपोर्ट करते. याची पीक ब्राइटनेस 2000 पर्यंत निट्स आहे. या फोनमध्ये Apple A16 Bionic चिपसेट देखील देण्यात आला आहे, जो 6GB च्या रॅमसह फोनच्या दमदार परफॉर्मेंससाठी तयार ठेवतो. या फोनमध्ये 3349mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे, जी वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी या आयफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 48MP चा प्रायमरी सेंसरसह 12MP चा अल्ट्रावाइड लेंस देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या डिव्हाईसमध्ये12 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे.