Ajit Pawar Funeral LIVE Updates in Marathi: अजित पवार यांना आज अखेरचा निरोप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर कायम विदर्भाकडे दुर्लक्ष केले, काहीच ठिकाणी पक्षाची मक्तेदारी कायम होती. यात जिल्ह्यातली काटोल, हिंगणा व यवतमाळमध्ये पुसद हे त्यांचे बालेकिल्ली ठरले होते. मात्र, राकाँचे दोन तुकडे झाल्यावर अजित पवार यांनी विदर्भाकडे विशेष लक्ष दिले. येथील कार्यकर्ते व सोबत आलेल्यांना ताकद दिली. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावर विदर्भात पक्ष बळकट करण्याची जबाबदारीही दिली होती. एवढेच नव्हे तर अर्थमंत्री म्हणून विदर्भाच्या पदरात मोठा निधी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे दादांचे विदर्भप्रेम दिवसेंदिवस अधिक घट्ट होत गेले.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विदर्भात महायुतीतून पक्षाचे ७उमेदवार दिले होते. त्यापैकी ६ ठिकाणी पक्षाचे आमदार विजयी झाले. यात अर्जुनी मोरगाव येथून राजकुमार बडोले, तुमसरमधून राजू कारेमोरे, सिरोंचातून धर्मराव बाचा आत्राम, बुलढाण्यातून मनोज कायंदे, अमरावतीतून सुलभा खोडके, पुसदमधून इंद्रनील नाईक आदींचा समावेश आहे. विदर्भातील चार महापालिकेपैकी अमरावतीत तब्बल ११ नगरसेवक निवडून आले. नागपूर व अकोल्यात प्रत्येकी १ नगरसेवक निवडून आले. चंद्रपुरात त्यांना संधी मिळाली नाही. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांनी स्वतः प्रचाराला हजेरीही लावली होती, हे विशेष…..
निधी देण्याची ग्वाही
काँग्रेस आघाडीत मंत्री असताना अजित पवार यांनी विदर्भाला कमी निधी दिल्याची कायम ओरड होती. विदर्भातील अनेक मंत्री त्यावेळी त्यांच्यावर टीका व नाराजीही व्यक्त करायचे. मात्र, महायुतीत आल्यानंतर व अर्थमंत्री म्हणून त्यांनी विदर्भाला झुकते माप दिले. पहिल्याच बजेटमध्ये त्यांनी विदर्भाच्या पदरात मोठा निधी टाकला. विदर्भाला जास्त निधी देणार असल्याचा शब्द त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिला. पुढील काळात विदर्भर्भातील आमदारांची तक्रार राहणार नाही, असा दावाही केला होता. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. त्यांनी फेब्रुवारीत बजट अधिवेशनात विदर्भाच्या पदरात जास्त निधी टाकण्याच्या दिलेला शब्दही त्यांच्या अकाली निधनाने कायमचा पुसून गेला.
Ans: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीनंतर आणि महायुतीत सहभागी झाल्यानंतर.
Ans: विधानसभा निवडणुकीत ७ पैकी ६ आमदार आणि महापालिकांत लक्षणीय यश.
Ans: विदर्भाला जादा निधी देण्याची घोषणा त्यांच्या अकाली निधनामुळे पूर्ण होऊ शकली नाही.






