Tech Tips: अँड्रॉईडमध्ये Battery Saver ऑन करताच फोनमध्ये काय बदल होतो? चुकीच्या वापरामुळे परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम
स्मार्टफोनमधील बॅटरी सेव्हर मोड ऑन करताच अलवेज-ऑन डिस्प्ले, ऑटो सिंक आणि इतर काही फीचर्स देखील तात्पुरत्या स्वरुपात बंद केले जातात. यामुळे डिस्प्ले आणि बॅकग्राउंड प्रोसेस कमी बॅटरीचा वापर करतात आणि तुम्ही दिर्घकाळापर्यंत अगदी सहज स्मार्टफोनचा वापर करू शकता.(फोटो सौजन्य: Pinterest)
जेव्हा तुम्ही अँड्रॉईडमध्ये बॅटरी सेव्हर मोड ऑन करता डिव्हाईसमधील बॅकग्राउंड ॲप्स त्वरित बंद केले जातात. यामागील कारण म्हणजे, बॅकग्राउंड ॲप्स सतत इंटरनेट, लोकेशन आणि प्रोसेसरचा वापर करतात, ज्यामुळे बॅटरी लवकर संपते. पण बॅकग्राउंड ॲप्स बंद केल्यास फोनमधील बॅटरीची बचत केली जाऊ शकते.
बॅटरी सेव्हर मोड ऑन करताच तुम्हाला फोनचा परफॉर्मंस डाऊन वाटू शकतो. कारण बॅटरी वाचवण्यासाठी आणि फोनचा वापर दिर्घकाळ करता यावा, यासाठी सिस्टिम प्रोसेसरची स्पीड देखील कमी करू शकतो. तुम्ही निरीक्षण केलं असेल की फोनमध्ये बॅटरी सेव्हर ऑन असतो तेव्हा गेमिंग, व्हिडीओ एडिटिंग किंवा इतर काम करताना फोन फुल स्पीडमध्ये काम करत नाही.
काही स्मार्टफोनमध्ये बॅटरी सेव्हर मोड ऑन करताच 5G नेटवर्कच्या जागी 4G नेटवर्क चालू केले जाते. याशिवाय, लोकेशन फीचर देखील बंद केले जाते. यामुळे बॅटरी सेव्ह केली जाते. मात्र यामुळे काही ॲप्समधील रियल-टाइम लोकेशन सर्विसवर परिणाम होतो.
बॅटरी सेव्हर ऑन करताच फोनची स्क्रीन ब्राईटनेस कमी केली जाऊ शकते आणि अनेक विजुअल इफेक्ट्स किंवा एनिमेशनवर देखील मर्यादा घातली जाते. काही स्मार्टफोन्समध्ये स्क्रीनचा रिफ्रेश रेट देखील कमी होतो, ज्यामुळे बॅटरी देखील कमी खर्च केली जाते.
सहसा लोकं अँड्रॉईड फोनमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त बॅटरी असून देखील बॅटरी सेव्हर मोड चालू करतात. पण वारंवार असं केल्यास डिव्हाईस खराब होऊ शकतं आणि स्मार्टफोनच्या परफॉर्मंसवर देखील परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांचे असे मानणे आहे की असे केल्याने फोनच्या एकूण परफॉर्मंसवर परिणाम होतो. जर तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी 20 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल तर बॅटरी सेव्हर मोड तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेषत:, लांब प्रवासादरम्यान जेव्हा तुम्हाला चार्जिंग करण्याची सुविधा मिळत नाही, तुम्ही बॅटरी सेव्हर मोड वापरू शकता.






