परदेशातही करू शकता Google Pay, Paytm आणि PhonePe वरून पेमेंट, कसं? जाणून घ्या
शॉपिंग, भाजी घेणं किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पेमेंट करायचे असेल तर आपण यूपीआय अॅप्सचा वापर करतो. Google Pay, Paytm आणि PhonePe याशिवाय इतर थर्ड पार्टी अॅप्सच्या मदतीने अगदी सहज ऑनलाईन पेमेंट केला जाऊ शकतो. हे अॅप्स केवळ भारतातच नाही तर परदेशातही आपली मदत करू शकतात. या अॅप्सच्या मदतीने इंटरनेशनल लेवलवर देखील पेमेंट केलं जाऊ शकतं. यामुळे परदेशात फॉरन एक्सचेंज किंवा कार्ड बाळगण्याऐवजी तुम्ही यूपीआय अॅप्सचा वापर करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
आता WhatsApp वरून घेता येणार ब्रेक, डेटाही राहणार सुरक्षित… लवकरच येतंय अनोखं फीचर
यूपीआय अॅप्सचा वापर करून इंटरनेशनल पेमेंट केलं जाऊ शकतं. पण यासाठी तुम्हाला या यूपीआय अॅप्ससह UPI इंटरनेशनल अॅक्टिव्ह करावा लागणार आहे. UPI इंटरनेशनल कशा प्रकारे काम करतं आणि युजर्सना या सुविधेचा कसा फायदा होऊ शकतो, याबद्दल जाणून घेऊया. ही सुविधा वापरण्यासाठी, तुमची बँक आणि तुमच्या व्यवसायाची बँक दोघांनीही UPI इंटरनॅशनलला सपोर्ट करणे आवश्यक आहे. शिवाय, आतापर्यंत फक्त सात देश UPI पेमेंट स्वीकारतात.
Airtel यूजर्सची मजाच मजा! कंपनीने अपडेट केला हा रिचार्ज प्लॅन, आता मिळणार पूर्वीपेक्षा जास्त डेटा